Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान गैरहजर राहिल्याने काँग्रेसची टीका…

Spread the love

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी रविवारी दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र गैरहजर होते . पंतप्रधानांचे हे वागणे असंसदीय नाही का असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या १७ जुलैपासून सुरु होऊन ते १२ ऑगस्ट पर्यंत चालण्याची शक्यता लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वर्तविली आहे. 

या सर्वपक्षीय बैठकीला सत्ताधारी पक्षातर्फे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल आणि मुरलीधरन उपस्थित आहेत. तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी आणि जयराम रमेश बैठकीला पोहोचले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे, जेडीयूचे रामनाथ ठाकूर, आपचे संजय सिंह, अकाली दलाकडून हरसिमरत कौर, शिवसेनेचे संजय राऊत आणि विनायक राऊत आणि सपाचे जावेद अली या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधानांची गैरहजेरी  ‘असंसदीय’ नाही का?”

मात्र, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. “संसदेच्या आगामी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी नुकतीच सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे आणि पंतप्रधान नेहमीप्रमाणे गैरहजर आहेत. हे ‘असंसदीय’ नाही का?”

अशी असेल कार्यवाही …

संसद भवन संकुलात सतराव्या लोकसभेचे नववे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी लोकसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीत सर्व नेत्यांचे स्वागत करताना, बिर्ला यांनी सांगितले होते की अधिवेशन १८ जुलै २०२२ पासून सुरू होत आहे आणि १२ ऑगस्ट २०२२ रोजी संपण्याची शक्यता आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अधिवेशनात १८ बैठका होणार असून एकूण १०८ तासांचा वेळ असेल, त्यापैकी सुमारे ६२ तास सरकारी कामासाठी उपलब्ध असतील, असे ते म्हणाले होते.

लोकसभेच्या अध्यक्षांनी असेही सांगितले होते की मागील अधिवेशनांप्रमाणेच या अधिवेशनातही योग्य कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन केले जाईल आणि त्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनात कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. बिर्ला यांनी आशा व्यक्त केली की सर्व सदस्य कोविड-19 प्रोटोकॉलशी संबंधित नियमांचे पालन करतील आणि त्यांचे पूर्ण सहकार्य करतील. अधिवेशन काळात कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित चालावे यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांचे ट्विट

सर्वपक्षीय बैठकीत आम्ही १३ मुद्दे मांडले. सरकार संसदेच्या अधिवेशनात ३२ विधेयके मांडणार असून त्यापैकी केवळ १४ विधेयके तयार आहेत. त्यांनी आम्हाला त्या १४ बिलांबद्दल सांगितलेही नाही. आमच्याकडे सत्रात केवळ १४ कामकाजाचे दिवस असतील. आम्हाला २० विषयांवर चर्चा करायची आहे आणि ३२ विधेयके मंजूर करायची आहेत: मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस

आपलं सरकार

Click to listen highlighted text!