Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BSPNewsUpdate : बसपानेत्या मायावती यांचे एका पाठोपाठ एक ट्विट …

Spread the love

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती  यांनी आज एकापाठोपाठ तीन ट्विट करून, जातीयवादी शक्ती बसपाला कमकुवत करण्यासाठी पडद्याआडून कारस्थान करत असतात. त्याचवेळी त्यांच्याकडून कागदी पक्ष बनवून निवडणुकीत दलित आणि शोषितांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्राणघातक प्रयत्न केला जात आहे अशा स्थितीत पक्ष आणि चळवळीच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

मायावतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , बसपाला कमकुवत करण्यासाठी जातीयवादी शक्ती पडद्याआडून कट रचत आहेत. बसपाला संपवण्यासाठी अनेक संघटना तयार करण्यात आल्या आहेत. त्यांचा खरा हेतू त्यांचा स्वार्थ सिद्ध करणे  हा आहे. या तीन पैकी एका ट्विटमध्ये त्यांनी आपला भाऊ आनंदचेही कौतुक केले आहे.

सीबीआयच्या छाप्यामुळे काही लोक दूर गेले …

‘दलित आणि उपेक्षितांमध्ये स्वार्थी लोकांची कमतरता नाही, यात माझ्या काही नातेवाईकांचाही समावेश आहे. माझ्या गैरहजेरीत माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य माझ्यापासून दूर गेले. मात्र, लहान भाऊ आनंद मला सोडून गेला नाही. त्याने  सरकारी नोकरी सोडून कुटुंबासमवेत माझी सेवा केली आणि पक्षाच्या कामातही तो सक्रिय झाला आहे.’

कागदी संघटनांमुळे सामाजिक ऐक्याला धोका

दरम्यान मायावतींनी बामसेफ आणि डीएस -४ चे  कागदी संघटना म्हणून वर्णन केले आहे. या स्वार्थी लोकांनी अनेक प्रकारच्या कागदी संघटना विशेषत: बामसेफ आणि डीएस -४ इत्यादी नावाने  तयार केल्या आहेत, ज्या सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या नादात आपला स्वार्थ सिद्ध करत आहेत. आता काही लोक बसपामध्ये निष्क्रिय झाले आहेत. ते दुसऱ्या मार्गाने  आपला स्वार्थ साधत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

जातीयवादी शक्ती पडद्याआडून बसपाविरोधात कट रचत असल्याचा आरोप बसपा अध्यक्षांनी केला आहे. तिसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, अशा प्रकारे जातीयवादी शक्ती बसपाला कमकुवत करण्यासाठी पडद्याआडून कारस्थान करत आहेत. त्याचवेळी त्यांनी कागदी पक्ष बनवून निवडणुकीत दलित आणि शोषितांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्राणघातक प्रयत्न करतात, अशांवरही हल्लाबोल केला आहे. पक्ष आणि चळवळीच्या हिताच्या दृष्टीने  सर्वांनी सावध राहण्याचे आवाहनही मायावतींनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!