Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : हेड कॉन्स्टेबलने ड्युटी सांभाळून मिळवली पीएचडी !!

Spread the love

औरंगाबाद:- शहर पोलिस विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले इरफान खान उस्मान खान यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी ही शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. ते पीएचडी पदवी मिळविणारे पहिले हेड कॉन्स्टेबल ठरले आहेत.

श्री खान यांनी या अगोदर उर्दू विषयांमध्ये मास्टर्स डिग्री तसेच जनसंवाद व पत्रकारिता मध्येही पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. त्यांनी “सय्यद इम्तियाज अली ताज की ड्रामा निगारी का तनखीदी व तजजियाती मुताअला” या विषयावर मौलाना आझाद महाविद्यालयाच्या उर्दू विभाग प्रमुख डॉ. काझी नवीद अहमद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर केला होता. त्यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, एडीजी संजय कुमार, आय जी डॉ. जय जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती, आणि डॉ. एच एस भापकर यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आभार प्रकट केले.

खान यांच्या या यशाबद्दल बोलताना माजी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती म्हणाले, “पोलिस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीएचडी पदवी मिळविली आहे परंतु इरफान खान हे सदर पदवी प्राप्त करणारे पहिले हेड कॉन्स्टेबल ठरले आहे”. सय्यद इम्तियाज अली ताज यांच्या नाटकांमध्ये 1922 मध्ये लिहिलेल्या  “अनारकली” चा ही समावेश असून त्या आधारावर भारतासहित अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे शो, नाटक आणि मुगल-ए- आजम सारखे चित्रपट ही बनविले गेले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!