Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : संसदीय , असंसदीय शब्द… काय आहे वाद ? , लोकसभा अध्यक्षांनी केला खुलासा …

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्हीही सभागृहाच्या कामकाजादरम्यान अनेक शब्द काढल्याचे जाहीर झाल्यानंतर नंतर विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. “कोणत्याही शब्दांवर बंदी नाही, काढलेल्या शब्दांचे संकलन सुरू आहे,” ते म्हणाले.

यावर तत्काळ स्पष्टीकरण देताना  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले कि , “लोकसभा सचिवालयाने काही असंसदीय शब्द हटवल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. ही लोकसभेची प्रक्रिया आहे. ती 1959 पासून सुरू आहे. संसदेत चर्चा आणि संवादादरम्यान आरोप-प्रत्यारोप होतात. पीठासीन अधिकारी काही शब्द हटवण्याचे निर्देश देतात, जे चर्चा करत आहेत त्यांना संसदेच्या अधिवेशनाची माहिती नसते. आवश्यकतेनुसार ते शब्द  हटवले जातात . हे सर्व सदस्यांच्या माहितीत आहे. आम्हाला हा अधिकार आहे. कोणत्याही शब्दांवर बंदी घातली नाही. गोंधळ घालू नका.”

असंसदीय शब्दांचा एक मोठा शब्दकोश…

असंसदीय शब्दांचा एक मोठा शब्दकोश आहे, त्यात 1100 पृष्ठे आहेत. 1954 पासून  1986, 1992, 1999, 2004, 2009, 2010 पासून दरवर्षी नियमितपणे असंसदीय शब्द काढले जातात. कोणत्याही शब्दांवर बंदी नाही. चर्चेदरम्यान एखादा शब्द काढला गेला की त्याचा उल्लेख केला जातो. संसदेचा विश्वास वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाचा बोलण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण असंसदीय किंवा अयोग्य वाटतील असे शब्द बोलू नका.

बिर्ला पुढे म्हणाले कि ,  भविष्यात कोणी असंसदीय शब्द वापरला तर तो कोणत्या संदर्भात वापरला जातो हे अवलंबून आहे. त्याला थांबवता येत नाही. सरकार लोकसभेला कधीही निर्देश देऊ शकत नाही आणि कोणत्याही शब्दावर बंधने घालू शकत नाही. जर एखाद्या वाहिनीने तो काढून टाकण्याचे निर्देश असतानाही असंसदीय शब्द वापरला आणि सदस्याने त्याबद्दल तक्रार केली तर प्रकरण विशेषाधिकार समितीकडे जाईल.

दरम्यान शब्द कोणत्या संदर्भात बोलला जातो हे महत्त्वाचे आहे. आधी विरोधकांनी आक्षेप घेतला नाही, मग आताच का घेतला जात आहे. कोणत्याही शब्दांवर बंदी नाही. त्यावेळी असंसदीय संदर्भात वापरल्यास तो काढून टाकला जातो, कोणत्याही सदस्याचा आक्षेप असल्यास तो सचिवालयाला विचारू शकतो.

संसदेचे सदस्य कधी कधी सभागृहात असे शब्द, वाक्य किंवा वाक्प्रचार वापरू शकतात, जे नंतर सभापती किंवा सभापतींच्या आदेशाने रेकॉर्ड किंवा कार्यवाहीतून बाहेर काढले जातात. लोकसभेतील कामकाजाच्या कार्यपद्धती आणि वर्तनाच्या नियम 380 नुसार, “चर्चेदरम्यान अपमानास्पद किंवा असंसदीय किंवा असभ्य किंवा असंवेदनशील शब्द वापरण्यात आल्याचे सभापतीचे मत असल्यास, ते त्यांना सभागृहातून काढून टाकण्याचे आदेश देऊ शकतात. हा सभागृहाच्या कामकाजाचा भाग आहे. त्याच वेळी, नियम 381 नुसार, सभागृहाच्या कामकाजाचा जो भाग काढायचा आहे त्यावर चिन्हांकित केल्यानंतर, कार्यवाहीमध्ये एक नोंद अशा प्रकारे घातली जाईल की ती सभापतींच्या आदेशानुसार काढली गेली असेही बिर्ला यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांची टीका

दरम्यान काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या धोरणाबद्दल ट्वीट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि , जुमलाजीवी, हुकूमशहा, शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे. असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. या शब्दांची एक लांबलचक यादी तयार करण्यात आली आहे. संसदेचे  कामकाज किंवा चर्चेदरम्यान हे शब्द वापरता येणार नाही, असे संसदेच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी  ”हा नवीन भारताचा नवीन शब्दकोष आहे”, असा टोला लगावला आहे. ”सरकारच्या कामकाजाचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान विरोधकांनी टीका यावर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश म्हणाले की, मोदी सरकारच्या “वास्तविकतेचे वर्णन करण्यासाठी” वापरले जाणारे सर्व शब्द आता ‘असंसदीय’ ठरवण्यात येणार आहे. “या पुढे काय विश्वगुरु? अस म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

कुठले शब्द आहेत ? जे वापरायचे नाहीत …

लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द (Unparliamentary Words 2021 ) या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांची यादी जारी केली आहे, ज्यांना लोकसभा आणि राज्यसभेसह राज्य विधानमंडळांमध्ये असंसदीय घोषित करण्यात आले होते. या यादीत समाविष्ट शब्दांना ‘असंसदीय अभिव्यक्ती’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

या अंतर्गत दोन्ही सभागृहात चर्चेदरम्यान लोकसभा आणि राज्यसभेच्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी तयार आलेल्या नियमानुसार  लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेत म्हटले की,  ‘हुकूमशहा’  जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी,  ‘जुमलाजीवी’, ‘चाइल्ड विजडम’, ‘कोविड स्प्रेडर’ आणि ‘स्नूपगेट’  ‘शरमदार’, ‘अब्यूज्ड, ‘बेट्रेड’, ‘भ्रष्ट’, ‘नाटक’, ‘ढोंगी’ ‘अकार्यक्षम’ शकुनी, Anarchist आणि dictatorial , खून से खेती, अराजकतावादी , दुटप्पी, निरुपयोगी, नौटंकी, ढोल बडवणारे, बहिरे सरकार, गद्दार, गिरगिट, घड़ियाली आंसू, अपमान, असत्य, अहंकार, करप्ट, काला दिन, काला बाजारी आणि खरीद फरोख्त असे अनेक इंग्रजी-हिंदी शब्द आहेत. याचा अर्थ संसदेत चर्चेवेळी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी हे शब्द वापरले गेले तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!