Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraElectionUpdate : राज्य निवडणूक आयोगाचा आरक्षण सोडतबाबत मोठा निर्णय

Spread the love

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील याचिकेची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम  स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलैच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता.

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली त्यावरील पुढील १९ जुलैला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

उद्या होणार होती आरक्षण सोडत

राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांसाठी उद्या १३ जुलैला राज्य निवडणूक आयोग आरक्षण सोडत जाहीर करणार होते. विशेष म्हणजे ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय असणार होती. त्याबाबतचा आदेशही राज्य निवडणूक आयोगाने काढला होता. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या संदर्भात जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीसाठी जागा राखून ठेवता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटलेले होते.

  • महानायक ऑनलाईनची वर्गणी भरून “महानायक”ला सपोर्ट करा.

वार्षिक Rs. 999/
मासिक Rs. 99/-
किंवा आपल्या इच्छेनुसार …

PhonePay / GooglePay साठी …
9421671520
डेबिटकार्ड , क्रेडिटकार्ड आणि ऑनलाईन बँकींगसाठी…
https://www.instamojo.com/@mahanayakonline/

आपलं सरकार

Click to listen highlighted text!