WorldNewsUpdate : राष्ट्रपतींच्या पलायनानंतर पंतप्रधान विक्रमसिंघे यांचाही राजीनामा , श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर…

कोलंबो : श्रीलंकेतील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणाबाहेर गेली असून राष्ट्रपतींनी आपल्या शासकीय निवासस्थातून पळ काढल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान शनिवारी राष्ट्रपतींविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी राष्ट्रपती भवनासमोरील पोलीस बॅरिकेड तोडून राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानात प्रवेश केला.राष्ट्रपतींच्या निवासस्थानासह आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला आहे. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षेही संपूर्ण कुटुंबासहया आधीच ११ मे रोजी पळून गेलेले आहेत.
Sri Lankan Prime Minister announces resignation, amid economic crisis
Read @ANI Story |https://t.co/xm971dieHx#SriLankaCrisis #SrilankanPMtoresign #SriLankaProtests pic.twitter.com/Y8YH9OTT0K
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022
दरम्यान आंदोलकांनी सभागृहातही दिवसभर गोंधळ घातला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिसांसह १०० जण जखमी झाले आहेत. श्रीलंकन जनतेचा हा आक्रोश लक्षात घेत, “राष्ट्रपतींना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. मात्र त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
श्रीलंकेतील अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईला आल्यामुळे त्रस्त असलेल्या जनतेनं आज राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. जनतेचा हा आक्रोश लक्षात येताच राष्ट्रपतींनी शुक्रवारीच नौदलाच्या विशेष विमानाने आपले निवासस्थान सोडून पळ काढला.
To ensure the continuation of the Government including the safety of all citizens I accept the best recommendation of the Party Leaders today, to make way for an All-Party Government.
To facilitate this I will resign as Prime Minister.
— Ranil Wickremesinghe (@RW_UNP) July 9, 2022
दरम्यान आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश करीत प्रचंड तोडफोड केली. राष्ट्रपतींना पळून जाण्यास भाग पाडल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी देखील तातडीने आपला राजीनामा दिला. श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांच्या घरी झालेल्या बैठकीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर गोतबाया राजपक्षे आणि रानिल विक्रमसिंघे राजीनामा देण्यास तयार झाले. यावर महिंदा यापा अभवयवर्धने अंतिम निर्णय घेणार आहेत. अखेर रानिल विक्रसिंघे यांनी राजीनामा दिला.