Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalLiveUpdate : शिंदे -फडणवीसांची दिल्ली वारी , माझे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल : मुख्यमंत्री

Spread the love

मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

माझे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुका जिंकेल: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

माझ्या पक्षाने मला आधी मुख्यमंत्री केले, आता पक्षाच्या गरजेनुसार आम्ही पक्षाच्या निर्णयाचे पालन केले आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्याच्या हाताखाली काम करू. अन्याय दूर झाला आणि आमची नैसर्गिक युती पुन्हा जिवंत झाली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमव्हीए सरकारच्या काळात आमच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते, तेव्हा आम्हाला बोलता येत नव्हते म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युतीच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

चर्चा संपली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरून निघाले.

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावर बैठक चालू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना विठ्ठल -रखुमाईची प्रतिकृती भेट दिली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी रवाना झाले.

नवी दिल्ली  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी काल रात्री  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बल पाच तास चर्चा झाल्याचे वृत्त असून आज हे दोन्हीही नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत ते  मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर पेचांबाबत चर्चा करीत आहेत. तत्पूर्वी ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटणार असून सायंकाळी पंतप्रधानांची भेट घेतील. आज सकाळीच त्यांनी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. 

यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट करीत म्हटले आहे कि ,  ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे’.

महाराष्ट्रात नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे, तर उर्वरित मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या आधीच्या मंत्री मंडळातील ८ मंत्र्यांसह शिंदे यांच्या गटातील १२ हून अधिक आमदारांना मंत्रीपदे मिळतील असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!