Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शहरात मोटारसायकल चोरांची टोळी सक्रिय , विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल

Spread the love

औरंगाबाद  : शहरात मोटारसायकल चोरांची टोळी सक्रिय झाली असून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ मोटारसायकली लंपास करण्यात आल्या आहेत. पोलिसांसमोर या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या घटना पुढीलप्रमाणे आहेत. या सर्व प्रकरणात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

एमजीएम परिसरातील गंगा हॉस्टेल समोर उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २८ जून रोजी घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अनंत प्रभाकर जोशी (वय ५५) रा. प्रथमेश नगर बीड बायपास यांनी २८ जून रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमजीएम परिसरातील गंगा हॉस्टेल समोर मोटरसायकल (क्र. एमएच २० इटी ३१९३ उभी केली होती. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून मोटरसायकल लंपास केली.

मिनी घाटी समोर चिकलठाणा येथे आयुब चांद शेख (वय ४५) रा. मोती कॉलनी गल्ली नंबर ५ चिकलठाणा यांनी २९ जून रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास मोटरसायकल (क्र. एमएच २० सीक्यू ३८८७) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने मोटरसायकल लंपास केली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेडा परिसरातील गणेश नगरातून एकाची मोटरसायकल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. ज्ञानेश्वर धोंडीराम कैलकर (वय २९) रा. गणेश नगर गल्ली नंबर १ पुंडलिक नगर गाडखेडा परिसर यांनी मोटरसायकल (क्र. एमएच २० एफक्यू २६४४) घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने लंपास केली, याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज परिसरातील मृगनयनी हॉटेल समोरून छावणीत राहणाऱ्या एका फौजीची मोटरसायकल लंपास केल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. महेंद्रसिंग दीपसिंग (वय ४०) रा. नगर नाका छावणी यांनी याबाबत फिर्याद दिली. महेंद्रसिंग हे ४ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पत्नीसह मृगनयनी हॉटेलमध्ये जेवण्यास गेले होते. हॉटेलच्या पार्किंगमध्ये मोटरसायकल (क्र. आरजे १९ एलएस ८९२०) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने पार्किंग मध्ये लावलेली मोटरसायकल लंपास केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धाच्या हाताला झटका देत मोबाईल लांबविला

औरंगाबाद, गार्डन समोर उभ्या एका वृद्धाच्या हाताला झटका देत मोबाईल लांबविल्याची घटना सिडको एन-१२ येथील स्वामी विवेकानंद गार्डन समोर घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार महादेव माने (वय ६२) रा. टीव्ही सेंटर एन-१२ हे सेवानिवृत्त कर्मचारी ६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वामी विवेकानंद गार्डन सिडको एन -१२ समोर उभे होते. तेव्हा दोन इसम चालत त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने विजयकुमार माने यांच्या हातात असलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विवाहितेचा छळ

औरंगाबाद, माहेरहुन गाडी घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार २१ फेब्रुवारी २०२१ ते २३ मार्च २०२२ पर्यंत पती प्रवीण राजकुमार अंबुरे, सासरे राजकुमार बाबुराव अंबुरे, सासू संगीता राजकुमार अंबुरे, नणंद पूजा कौस्तुभ दीपक राहणार सर्व अंबुरे निवास, सारडा गल्ली सोनपेठ जि. परभणी तसेच नणंद प्रिया अभिजीत बुबने, अभिजीत बुबने रा.सोलापूर यांनी घरातील छोट्या मोठ्या कारणावरून वाद घालत मारहाण केली. तसेच वडिलांकडून गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये घेऊन ये व तुझ्या पगारावर कर्ज काढून फ्लॅट घे असे म्हणत छळ केला. पुंडलिकनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अवैध देशी दारू विक्री

औरंगाबाद, पीर बाजार ते आनंद गाडे चौक रस्त्यावर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एकाला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. योगेश ताराचंद कटारे (वय ३२) रा. सोनार गल्ली पदमपुरा असे आरोपीचे नाव आहे. योगेश कटारे हा ६ जुलै रोजी रात्री साडे आठ वर्षाच्या सुमारास पीर बाजार कडून आनंद गाडे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध देशी दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ६० हजार रुपये किंमतीची हिरो होंडा मोटरसायकल तसेच ६ हजार ९० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड लाखांच्या दागिन्यांसह वीस हजार लांबविले

औरंगाबाद, बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह वीस हजारांची रोख रक्कम लांबवण्याची घटना उस्मानपुरा परिसरातील शंभू महानगर सहकार नगर सोसायटीत घडली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या शंकर तिडके (वय ६३) राहणार ए-३ निर्माण सोसायटी, शंभू महानगर सहकार नगर यांनी याबाबत फिर्याद दिली. संध्या तिडके या बाहेरगावी गेल्या असता २ जुलै ते ६ जुलै दरम्यान चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे गंठण, ७० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे ताट व करंडे यासह २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. तसेच एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद व बँक ऑफ महाराष्ट्र बारामतीच्या लॉकरच्या चाव्या, होंडा एक्टिवाचे मूळ आरसी बुक चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीचा प्रयत्न ; दोघांवर गुन्हा

औरंगाबाद, लोखंडी साहित्य चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश घन:शाम पवार (वय ४५) रा. परभणी व एक अनोळखी इसम अशी आरोपींची नावे आहेत. बस स्थानक परिसरातील देवप्रिया हॉटेलचे मॅनेजर खान आतिफ एजाज युसूफ खान (वय ४३) रा. असेफिया कॉलनी घाटी रोड यांनी याबाबत तक्रार दिली. आरोपींनी ६ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हॉटेल देवप्रिया कार्तिकी सिग्नल येथे लोखंडी पत्रा व लोखंडी साहित्याची चोरी करण्याचा प्रयत्न केला. क्रांती चौक पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सोन्याची चैन घेत मित्राची फसवणूक

औरंगाबाद, विश्वासाने मित्राला दिलेली सोन्याची चेन परत न करता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिर्झा बेग लड्डू बेग रा. टाइम्स कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद हुसेन (वय ५५) रा. अब्दुल वहीद मंजिल पहिला मजरा रोहीला गल्ली यांनी तक्रार दिली. १ नोव्हेंबर २०२१ ते १९ जून २०२२ या काळात मोहम्मद युनूस याने मिर्झा बेग याला काही रोख रक्कम व २३.८४१ मिलिग्रॅम वजनाची व १ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची चेन विश्वासाने दिली होती. मात्र मिर्झा बेग याने ही सोन्याची चैन स्वतःची असल्याचे सांगून मन्नपुरंम फायनान्सकडे गहाण ठेवली. मोहम्मद युनूस रोख रक्कम व सोन्याची चैन परत मागण्यास गेले असता तुला काय करायचे ते करून घे, असे म्हणत धमकी दिली. या प्रकरणी सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!