Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सेवानिवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ

Spread the love

मुंबई  : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सेवानिवृत्त होताच सक्तवसुली संचालनालयाने ५ जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले होते. नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजमधील (राष्ट्रीय शेअर बाजार) सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. यानंतर आता २००९ ते २०१७ या काळात एनएसई कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने  एमएचएच्या आदेशानंतर एनएसई घोटाळ्यात संजय पांडे यांच्या विरुद्ध बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी देशभरात सीबीआयने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही ९ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा हिने संजय पांडे यांना एनएसई मधील लोकांचे फोन टॅप करण्यास सांगितले होते.

या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत  १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. यात मुंबईत ८, पुण्यात २, चंदीगड १, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक, तर दिल्ली एनसीआरमध्ये ५ छापे टाकण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!