Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीचा कार्यक्रम घोषित …

Spread the love

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे.

महराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी १८ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुस-या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत.

‘अ’ वर्गातील नगरपरिषदा

भुसावळ (जि. जळगाव)
बारामती (जि. पुणे)
बार्शी (जि. सोलापूर)
जालना (जि. जालना)
बीड (जि. बीड)
उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

‘ब’ बर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा
मनमाड
सिन्नर
येवला

धुळे जिल्हा
दोंडाईचा-वरवाडे
शिरपूर-वरवाडे

नंदुरबार जिल्हा
शहादा

जळगाव जिल्हा
अमळनेर
चाळीसगाव

अहमदनगर जिल्हा
संगमनेर
कोपरगाव
श्रीरामपूर

पुणे जिल्हा
चाकण
दौंड

सातारा जिल्हा
कराड
फलटण

सांगली जिल्हा
इस्लामपूर
विटा

सोलापूर जिल्हा
अक्कलकोट
पंढरपूर
अकलूज (नवनिर्मित)

कोल्हापूर जिल्हा
जयसिंगपूर

औरंगाबाद जिल्हा
कन्नड
पैठण

बीड जिल्हा
अंबेजोगाई
माजलगाव
परळी-वैजनाथ

लातूर जिल्हा
अहमदपूर

अमरावती जिल्हा
अंजनगाव-सुर्जी

‘क’ बर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा
चांदवड
नांदगाव
सटाणा
भगूर

जळगाव जिल्हा
वरणगाव
धरणगाव
एरंणडोल
फैजपूर
पारोळा
यावल

अहमदनगर जिल्हा
जामखेड
शेवगाव
देवळाली प्रवरा
पाथर्डी
राहता
राहुरी

पुणे जिल्हा
राजगुरूनगर
आळंदी
इंदापूर
जेजुरी
सासवड
शिरुर

सातारा जिल्हा
म्हसवड
रहिमतपूर
वाई

सांगली जिल्हा
आष्टा
तासगाव
पलूस

सोलापूर जिल्हा
मोहोळ
दुधनी
करमाळा
कुर्डुवाडी
मेंदगी
मंगळवेढा
सांगोला

कोल्हापूर जिल्हा
गडहिंग्लज
कागल
कुरुंदवाड
मुरगूड
वडगाव

औरंगाबाद जिल्हा
गंगापूर
खुल्ताबाद

जालना जिल्हा
अंबड
भोकरदन
परतूर

बीड जिल्हा
गेवराई
किल्ले धारुर

उस्मानाबाद जिल्हा
भूम
कळंब
मुरुम
नळदुर्ग
उमरगा
परंडा
तुळजापूर

लातूर जिल्हा
औसा
निलंगा

अमरावती जिल्हा
दर्यापूर

बुलडाणा जिल्हा
देऊळगाव राजा

4 नगरपंचायतांच्याही निवडणुका

अहमदनगर – नेवासा
पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित)
पुणे/बारामती – माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)
सोलापूर/मोहोळ – अनगर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!