Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अखेर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पदावरून झाले पायउतार

Spread the love

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वादांमध्ये अडकलेल्या जॉन्सनच्या सरकारमधून डझनहून अधिक खासदारांनी राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन १० डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर बोलताना ते म्हणाले कि , “संसदेत कंझर्व्हेटिव्ह पक्षाची इच्छा आहे की पक्षाला नवा नेता असावा. याचा अर्थ नवीन पंतप्रधान असावा.”

नवीन पंतप्रधान निवडून येईपर्यंत ते पदावर राहतील. ब्रेक्झिट पंतप्रधानपदाच्या तीन  वादग्रस्त वर्षानंतर बोरिस जॉन्सन म्हणाले, “टोरी नेतृत्वाच्या शर्यतीला नवीन वेळापत्रकाची आवश्यकता असेल. हे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते.” कोरोना महामारीमुळे त्यांची विश्वासार्हता सतत धोक्यात आली होती. दरम्यान अविश्वासाचा आरोप करत बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळातील ४० पेक्षा जास्त आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली होती.

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला होता. ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषी सुनक मूळचे भारतीय असून इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्तींचे जावई आहेत. सुनक यांच्या व्यतरिक्त पेनी मॉरडॉन्ट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस, डोमिनिक राब यांचे सुद्धा नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत घेण्यात येत आहे. त्यानंतर आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

बीबीसी आणि इतर मीडिया हाऊसने वृत्त दिले की नेतृत्वाची निवडणूक उन्हाळ्यात होईल आणि विजेता ऑक्टोबरच्या सुरुवातीला पक्षाच्या वार्षिक परिषदेत बोरिस जॉन्सनची जागा घेईल. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी होती. बीबीसीने ही माहिती दिली आहे. नवनियुक्त मंत्र्यांनीही त्यांचा त्याग केला होता आणि ५० हून अधिक सदस्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.

यापैकी ८ मंत्री आणि दोन राज्य सचिवांनी गेल्या २४ तासांत राजीनामे दिले. यामुळे जॉन्सन अत्यंत एकाकी पडला आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन्सनला आता बंडखोर नेत्यांच्या मागण्यांपुढे झुकावे लागले आणि नंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळाले, त्यामुळे या पक्षाच्या नेत्यालाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर राहण्याचा अधिकार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!