Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : राज ठाकरेंच्या मनसैनिकाची चोरलेली पावशेर सोन्याची साखळी पोलिसांनी मिळवली !!

Spread the love

औरंगाबाद- दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील जाहीर सभेतून नांदेड मन से जिल्हाध्यक्षाची २०० ग्रॅम वजनाची ६ लाख रु ची सोन्याची चैन लंपास करणाऱ्या रेकॉर्डवरच्या दोघांना सिटीचौक पोलिसांनी पुणे येथून मुद्देमालासहीत . अटक करून आणले

दत्ता श्रीमंत जाधव (२५) उमेश सूर्यभान ट ल्ले (३५) रा. गांधीनगर झोपडपट्टी बीड अशी अटक आरोपीची नावे आहेत. तर नांदेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग धर्मसिंग जहागीरदार (३८) रा. नांदेड असे फिर्यादीचे नाव आहे .
१ मे २०२२ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंची जाहीर सभा होती त्या सभेसाठी मराठवाड्यातून सर्व जिल्ह्यांमधून म न से चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शहरांत दाखल झाले होते, रात्री आठ च्या सुमारास व्हेएआयपी प्रवेश दारा समोर राज ठाकरेंचे पदाधिकारी हजर होते त्याच वेळेस वरील चोरटयांनी जहागीरदार यांची सोन्याची चैन लांबवली.

या प्रकरणी सिटीचौक पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सभास्थळीचे सी.सी. टीव्ही फुटेज तपासले खबऱ्याकडून वरील अनोळखी चोरटयांची माहिती मिळवली ते बीड येथील रेकॉर्डवरचे गुन्हेगार निघाले. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय अशोक भंडारे , पीएसआय कल्याण चाबुकस्वार , पोलीस कर्मचारी अभिजित गायकवाड हे बीड ला गेले असता चोरटे पुण्यात असल्याचे खबऱ्याने सांगितले बीडहून सिटीचौक पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचल्यावर आरोपी दत्ता जाधव ला विश्वासात घेत ६ लाख रु च्या सोन्याच्या चैन बद्दल विचारताच त्याने चोरीची कबुली दिली व त्याच्या बीड मधील साथीदाराकडून मुद्देमाल जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या, वरील कारवाई पोलीस उपायुक्त उजवला वाणकर, सहाय्य्क पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!