Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaravatiNewsUpdate : अमरावती हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडला अखेर पोलिसांकडून अटक

Spread the love

अमरावती : जयपूर पाठोपाठ देशात गाजणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडला अखेर पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त आहे. इरफान खान असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आधीच सहा जणांना अटक केली आहे. भाजपच्या  राष्ट्रीय प्रवक्त्या  नुपूर शर्मा यांचे समर्थन केले जयपूर येथे झालेल्या कन्हैयालालच्या हत्येचे प्रकरण राजस्थानात गाजत असताना महाराष्ट्रात अमरावतीच्या उमेश कोल्हे यांचीही याच कारणावरून हत्या केल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना आता अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

दरम्यान इरफान खान हा या हत्येचा मास्टरमाईंड असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता आणि  त्याच्या सांगण्यावरूनच आरोपींनी २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली असे  पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

खा . अनिल बोंडे  यांनी याबाबतची तक्रार करताच त्यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नव्हता. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू होता, आज पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून तशी माहिती दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली. नंतर घटनास्थळीसुद्धा पाहणी केली होती. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचीसुद्धा झाडाझडती घेतली असल्याची माहिती दिली असल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!