Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra political News Update : शिंदे सरकारची बहूमत चाचणी, उद्या काय होऊ शकते….

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिला मोठा विजय मिळवला. रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, त्यात शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. आता उद्या सोमवारी फ्लोर टेस्टमध्ये एकनाथ शिंदे यांना आपली ताकद सिद्ध करायची आहे.

दरम्यान आजच्या घडामोडी लक्षात घेता  विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी फ्लोअर टेस्टचा रस्ता सोपा दिसत आहे. कारण रविवारी झालेल्या स्पीकरच्या निवडणुकीत शिंदे गटाचे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164, तर उद्धव गटाचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार आणि AIMIM चे आमदार यांनी एकाही बाजूने मतदान केले नाही.

यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे आकडे खूपच रंजक झाले आहेत.  समजा शिवसेनेच्या सर्व 39 बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व शिवसेनेच्या मते संपुष्टात आले तरीही विरोधकांकडे उरेसे संख्याबळ नाही. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असून, त्यापैकी एका आमदाराचे निधन झाले आहे. 39 बंडखोर सदस्यांना काढून टाकल्यानंतर एकूण सदस्य संख्या 248 होते, त्यानंतर बहुमताचा आकडा 125 होतो.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीन डझनहून अधिक आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात बंड केले होते. प्रथम बंडखोर आमदार मुंबईहून सुरतला पोहोचले, त्यानंतर त्यांना सुरतहून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये राहण्यात आले. त्यानंतर ते गुवाहाटीहून गोव्यात पोहोचले. दरम्यान, राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. ज्याला उद्धव सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. आणि आज पहिला विजय शिंदे यांच्या गटाने आणि भाजपने मिळवला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!