Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SharadPawarNewsUpdate : शरद पवारांनी सांगितला कायद्याचा पेच ….बंडखोरांच्या मत परिवर्तनाची व्यक्त केली आशा…!!

Spread the love

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेचे कायद्याचे अनेक पेच सांगितले. पवार म्हणाले कि, विधानसभेच्या अध्यक्षपदी अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना पाळावाच लागणार आहे.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1543301875243528193

सभागृहातील कायद्याची बाजू लक्षात घेता , विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मांडताना गटनेत्याचा पक्षादेश (व्हीप) महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या वेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहणार असून, बंडखोर आमदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या बहूमत प्रस्तावाच्या वेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयावरही ही प्रक्रिया अवलंबून आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इतके दिवस ‘विशेष काळजी’ घेण्यात आली. मात्र, सभागृहात आल्यानंतर हे ‘विचारवंत’ काय करणार आहेत, याकडे लक्ष राहणार आहे. सभागृहात आल्यानंतर या आमदारांच्या मतप्रवाहात बदल झालेला दिसेल, अशी अशा पवारांनी व्यक्त केली.

राज्यपालांनाही पवारांनी घेतले चिमटे …

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले कि , विधिमंडळ सभागृहात १९६७ ते १९९० या कालावधीत मी होतो. अनेक वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. या कालावधीत राज्यपालांनी कोणाला पुष्पगुच्छ किंवा पेढा भरवताना पाहिले नाही. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्यावेळी एका आमदाराकडून शपथविधीची सुरुवात इतर नावाने केल्याने कोश्यारी यांनी हटकले होते. त्या वेळी कोश्यारी यांनी माझा दाखला दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतांना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची नावे घेत सुरुवात केली मात्र त्यांना कोणीही हटकले नाहीच, याउलट कोश्यारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, अशा शब्दांत पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना चिमटा घेतला.

खेळात मी कधीही राजकारण आणले नाही ….

कुस्तीगीर संघटना बरखास्तीच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले कि , मी  अनेक क्रीडा संघटनांचा मी अध्यक्ष होतो. मी भारतीय क्रिकेट संघाचा अध्यक्ष होतो , जागतिक संघाचाही अध्यक्ष होतो पण खेळात कधीही राजकारण आणले नाही. राज्य कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष असलो तरी केवळ खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे, खेळाडूंना मदत करणे, त्यांना चांगल्या सुविधा, प्रशिक्षण मिळवून देणे यासाठी साहाय्य केले. राहुल अवारे, अभिजित कटके, उत्कर्ष काळे आदी खेळाडू यांचे खेळ आणखी चांगले होण्यासाठी त्यांना मदत केली. काही खेळाडूंना वैद्यकीय मदत केली, तरी कुस्तीगीर संघटना बरखास्तीचा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!