Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra political update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल, बैठकीत ठरणार अधिवेशनाची स्ट्रॅटेजी… !!

Spread the love

मुंबई : अखेर तब्बल ११ दिवसांच्या भ्रमंती नंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले असून नियोजित पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करीत आहेत. नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेसाठी आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व आमदार मुंबईत आले आहेत. या सर्व आमदारांसठी विमानतळ ते ताज हॉटेल पर्यंत कडेकोट बंदोबस्तात पूर्णतः सुरक्षित रस्ता तयार करण्यात आला होता. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या या बंडखोर आमदारांची आज मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आमदारांच्या बैठकीला मार्गदर्शन करतील.  या आमदारांसोबत भाजपचे देखील सर्व आमदार असणार आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचाही समावेश होता. विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांना घेऊन या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या. ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाले आहेत. फडणवीस सर्व 168 आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते उद्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!