Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : राज्यातील राजकीय घडामोडीबाबत “या” घटना तज्ज्ञाला वाटले वाईट …

Spread the love

मुंबई : राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्षात सर्व सामान्य जनता कोण योग्य कोण अयोग्य हे तपासात असताना या संपूर्ण सद्यस्थितीवर राज्यघटनेचे अभ्यास उल्हास बापट यांनी भाष्य करताना  राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून ही संपूर्ण परिस्थिती पाहिली की वाईट वाटत असल्याचे विधान केले होते.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. याबाबत बोलतांना उल्हास बापट यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, राज्यपाल पदाचा गैरवापर होत आहे. खरे तर राज्यपालांनी मुख्यमत्र्यांच्या सूचनांनुसारच वागावे  लागते. सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना बोलूनच करावे लागत. त्यामुळे त्यांच्या मते राज्यपालांनी उद्या बोलावलेले  अधिवेशन घटनाबाह्य होते.

दरम्यान राज्यपालांची भूमिका संशयाच्या विळख्यात येणार असेल तर हे दुर्दैव असल्याचे सांगत ते म्हणाले कि ,  सध्याच्या स्थितीत राजकारणाचा विजय होत आहे मात्र घटनेची पायमल्ली केली जात आहे. राज्यपालांनी अनेकवेळा घटनेचे  उल्लंघन केले आहे. यावेळी उल्हास बापट यांनी १२ आमदारांची प्रलंबित निवड प्रक्रिया आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाहटेचा शपथविधी याची आठवण करुन दिली.

राज्यपाल हे केंद्राचे नोकर नसतात तर ते एका राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांना काम करावे लागते हे घटनेत स्पष्ट आहे. काही निर्णय ते घेऊ शकतात, असेही उल्हास बापट यांनी म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!