Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Update Live : मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याननंतर नव्या सरकारच्या स्थापनेच्या दृष्टीने राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत. माध्यमांच्या अंदाजानुसार भाजपनेते देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजेच शुक्रवारी (१ जुलै) राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे सांगण्यात येत आहे. नवीन सरकारमध्ये भाजप बरोबरच शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे ३९ आमदार आणि त्यांच्यासोबतचे ९ अपक्ष अशा ४८ आमदारांचाही सहभाग असणार आहे. सत्ता स्थापनेच्या ताज्या घडामोडी पुढे दिलेल्या आहेत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून म्हटले आहे कि , भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांचा अनुभव आणि कौशल्य सरकारसाठी एक संपत्ती असेल. मला खात्री आहे की ते महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत करतील.तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे कि ,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदे एक तळागाळातील नेते असून त्यांच्यासोबत जो समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव आहे तो महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी करील असा मला विश्वास आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी केले अभिनंदन…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे एका ट्विटद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हार्दिक अभिनंदन.त्यांनी पुढे म्हटले आहे कि , मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी समर्पित भावनेने काम करेल.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून मोठे मन दाखवून देवेंद्रजींनी महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. असेही शहा यांनी म्हटले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी संध्याकाळी 7.30 वाजता होणाऱ्या शपथविधी समारंभात ऐन वेळी तिसरी खुर्ची जोडली गेली.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत …

राज्यपाल दाखल, काही क्षणात शपथविधीला होणार सुरुवात

राज्यपाल भगसिंह कोश्यारी दाखल झाले असून काही क्षणात शपथविधीला सुरुवात होणार आहे. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील

“देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं”; भाजपा अध्यक्षांचा आदेश

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक विनंती केली असून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे..,” भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

एकनाथ शिंदे यांच्या नावाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार, गोव्यातील हॉटेलमध्ये नाचून आनंद साजरा करताना

“एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी होणार,” अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन  सत्ता स्थापन करण्याचा  दावा केला. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली. “भाजपाचे कार्यकर्ते असो की एकनाथ शिंदे याचे शिवसैनिक असो कुणालाही शपथविधी सोहळ्याला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

हिंदुत्व आणि सावरकरांच्या विरोधात शिवसेनेने युती केली. शिवसेनेने जनतेच्या जनादेशाचा अवमान केला : भाजप नेते देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे निघाले. यावेळी दोघांनीही एकमेकांचे स्वागत करून सरकार बनविण्यावर चर्चा केली.

– महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

  • एकनाथ शिंदे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले आहेत.

    • शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले असून त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही विमानतळावर उपस्थित आहेत.

  • काँग्रेस नेत्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये  बाळासाहेब थोरात, पृथ्वाराज चव्हाण, नाना पटोले, सुनील केदार आदि नेत्यांची उपस्थिती आहे.

“त्या ” १६ आमदारांना यांचा व्हिप मानणे बंधनकारक : केसरकर

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या त्या १६ आमदारांचे के होईल ? असे विचारले असता  बंडखोर गटाचे प्रवक्ते आ. केसरकर म्हणाले की , आम्ही विधीमंडळात यांच्या पक्षाची नोंदणी केली असून त्यासाठी यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनी आम्हाला स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे ते १६  आमदार त्यांचा स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाहीत. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्यांना देखील बंधनकारक राहील. मात्र आम्ही त्यांना आमच्यासोबत चला असे म्हणणार नाही.

मनसे नेते राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी ट्विटरवर आपली आगळी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे . अर्थात त्यांनाच टोला कुणाला आहे हे मात्र समाजाने अवघड आहे. आपल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि , एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.

नेमके हेच घडले!

संजय राऊत आपल्या प्रतिक्रियेसाठी आणि वक्तव्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी आज ” नेमके हेच घडले!” असे लिहून एक चित्र पोस्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!