Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalCrisis : मोठी बातमी : दिल्लीहून परतातच देवेंद्र फडणवीस सक्रिय , गाठले राजभवन , अपक्ष आमदारांची “फ्लोअर टेस्ट” घेण्याची मागणी …

Spread the love

मुंबई : राज्याच्या राजकारणात आता “वेट अँड वॉच”ची भूमिका घेतलेले भाजपनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यानंतर सक्रिय झाले असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुंबईत येताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटीसाठी राजभवनात गेल्याचे वृत्त आहे . तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी असलेल्या आठ अपक्ष आमदारांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर ईमेल पाठवून तातडीने फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली आहे. यामुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस राज्यपालांसोबतच्या बैठकीत या मागणीवर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस,म्हणाले कि , आम्ही महाराष्ट्राच्या राज्यपालांना एक पत्र दिले असून तत्काळ फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे:, शिवसेनेचे ३९ आमदार सांगत आहेत की त्यांना राष्ट्रवादी, काँग्रेस सरकारसोबत राहायचे नाही; एमव्हीए सरकारने बहुमत गमावले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना तत्काळ फ्लोर टेस्टद्वारे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ३० जून रोजी विधानसभेत फ्लोअर टेस्ट होईल असे जे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे ते फेक असल्याचा खुलासा महाराष्ट्र राजभवनाकडून करण्यात आला आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या बंडाशी आमचा काहीही संबंध नाही तो शिवसेनेचे अंतर्गत मुद्दा आहे. आम्ही केवळ “वेट अँड वॉच”च्या भूमिकेत आहोत असा दावा भाजपकडून केला जात होता. विशेष म्हणजे आज फडणवीस यांनी तातडीचा दिल्ली दौरा केला आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि ते मुंबईत परत आले . दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी थेट राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी  भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत आले आणि आता ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

सरकारच्या अविश्वास ठरावावर चर्चा

शिवसेनेचे पदच्यूत गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर तब्बल ४० आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले  आहे. ताज्या वृत्तानुसार अपक्ष आठ आमदारांनी राज्यपालांच्या अधिकृत ईमेलवर बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या विषयावर देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीत ठाकरे सरकारच्या भविष्यावर चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे आपल्या दिल्ली दौऱ्यापूर्वी फडणवीस यांनी  काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फडणवीसांची चर्चा झाली. गेल्या आठवड्याभरातील ही फडणवीसांची पाचवी दिल्लीवारी आहे. दिल्लीहून परतल्यावर आज संध्याकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पुन्हा एकदा भाजप नेत्यांची बैठक झाली होती. तिथून फडणवीस थेट राजभवनावर गेले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!