Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalCrisis : चर्चा तर होणारच…!! संजय राऊत यांचे आणखी एक ट्विट

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठा झटका बसला आहे. शिंदे गटावर सातत्याने निशाणा साधणाऱ्या राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी समन्स बजावले असून आज  हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीच्या वतीने मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र आपण ईडीच्या चौकशीला जाणार हे नक्की मात्र नियोजित कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे आज येणार नसल्याचे त्यांनी ईडी ला कळविले असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत आहेत. आता राज्यात राजकीय  संघर्ष चालू असताना संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान मला अटक करा मी कुठल्याही चौकशीला घाबरत नसल्याचे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना नेत्याची अलिबागची जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्याची नोटीस दिली होती. ईडीचा दावा आहे की गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरने अनियमितता करून 1,039 कोटी रुपये कमावले आणि त्याच पैशातून 55 लाख रुपये गुरु आशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला दिले. ज्यांच्याकडून मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. आता त्याला याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

दरम्यान संजय राऊत नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असतात नेहमीप्रमाणे आज सकाळीच त्यांनी पुन्हा नवीन ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ” जहालत ” एक किसम कि मौत है , और जाहिल लोग चलती फिरती लाशे है ” असे चित्र पोस्ट केले आहे.

या… मला अटक करा! जय महाराष्ट्र

संजय राऊत यांनी त्यांना ईडी समन्स आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच  आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि ,  “मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या… मला अटक करा! जय महाराष्ट्र!” धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी हे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.

ईडीने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. २०१० मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले आहे. वर्षां राऊत यांनी ही रक्कम दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. तसेच अलिबागमध्येही भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने काही मालमत्तांवर टाच आणली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!