Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewUpdate : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित

Spread the love

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले असल्याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली आहे .आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , ‘काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’

दुसऱ्या एका वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खात्याची फेररचना केली असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा आजारी आहेत त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुळे क्वारंटाईन झाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती मात्र आता राज्यपाल कोरोनातून बरे होऊन राजभवनात परतले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!