Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन मुलांचा रिक्षाचालकावर चाकू हल्ला , चौघांचीही बालसुधारगृहात रवानगी

Spread the love

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी, जटवाडा परिसरात अल्पवयीन तरुणांना रस्ता देत नसल्यामुळे मारहाण करणार्‍या रिक्षा चालकावर चाकूचे वार करुन जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आज बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात अली आहे.


या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , २३जून रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास जटवाडा रस्त्यावर रिक्षाचालक शेख काजीम शेख फारुक(२२) हा रिक्षा चालवत असतांना रस्त्यावर चौघे अल्पवयीन तरुण रिक्षा चालकाच्या हाॅर्नला प्रतिसाद न देता रस्ता अडवून उभे होते. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला घेत रिक्षा चालकाने चौघांना मारहाण करायला सुरवात केली. त्यामुळे त्या चौघांपैकी एकाने रिक्षा चालकावर चाकू हल्ला करंत त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत शेख काजीम ला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. आज जखमी शेख काजीम शुध्दीवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी  बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा चार अल्पवयीन तरुणांवर दाखल झाला आहे.त्यांना बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. उद्या बालकल्याण समिती समोर आरोपींना हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विशाल बोडखे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!