Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कचरा वेचणार्‍या वृध्देला ३ लाखांना गंडवले, पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद -छावणी परिसरात कचरा वेचणार्‍या वृध्देला एका फसवणूक झालेल्या महिलेने दुसर्‍याचा भूखंड विकून २ लाख ९० हजारांचा गंडा घातला.या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमल सूर्यभान जाधव (६५) रा.पडेगाव असे फसवणूक झालेल्या वृध्देचे नाव आहे.


पडेगाव परिसरातील भीमसंदेश सोसायटीमधे १२००स्क्वे.फूट.भूखंड आहे.तो हर्सूल परिसरातील रंजना दौंड यांचा असल्याची माहिती. फिर्यादीच्या ओळखीचा इस्टेट एजंट कैसर अहमद ने सांगून २ लाख ९० हजारांमधे कमल जाधव यांना दौंड यांना विकावयास लावला. पण प्रत्यक्षात २०२१ मधे भूखंडावर बांधकाम सूरु करण्यासाठी कमल जाधव गेल्या असता सोसायटीचे सचिव मोकळे यांनी २०१९ मधे हा भूखंड सविता बनकर यांना सोसायटीने ए लाॅट केल्याचे सांगितले.

या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कमल जाधव पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्याकडे गेल्या. पोलिस आयुक्तांनी प्रकरण छावणी पोलिसांना हाताळण्याचे आदेश दिले. पोलिस तपासात उघंड झाले की, यापूर्वीच्या खरेदीदार रंजना शेषराव दौंड यांनाही हा भूखंड अशाच पध्दतीने विकला होता.पण दौंड यांनी पोलिसांकडे धाव न घेता. वृध्देला फसवून पैसे वळते करुन घेतले.

दरम्यान कमल जाधव यांनी रंजना दौंड व कैसर अहमद यांना वेळोवेळी पैसे परत मागितले.पण अद्याप पर्यंत मिळाले नाहीत.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग भागिले करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!