Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EknathShindeNewsUpdate : ताजी बातमी : एकनाथ शिंदे यांचे ३७ शिवसेना आमदारांच्या सह्यांचे पत्र ….जाणून घ्या कोण आहेत हे आमदार ?

Spread the love

गुवाहाटी : अखेर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार असलेल्या ३७ जणांच्या सह्यांचे पत्र  सभापतींच्या नावे पाठवले असून सोबत विधिमंडळ नेतेपदी भारत गोगावले यांची नियुक्ती केल्याचे पत्र आणि ठरावही सोबत पाठवला आहे त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून शिंदे सुटले असल्याचे या पत्राद्वारे दाखवण्यात आले आहे.


पक्षांतरबंदी कायद्याच्या कायद्याच्या नियमानुसार कारवाई होऊ नये यासाठी लागणाऱ्या दोन तृतीयांश शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे रवाना करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार असून पक्षातून वेगळा गट स्थापन करायचा असल्यास किमान दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ पाठीशी असावे लागते. त्यासाठी शिंदे यांना ३७ आमदारांची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या सह्याचे पक्ष विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. यामध्ये सर्व ३७ बंडखोर आमदारांच्या सह्या आहेत.
दरम्यान या पत्रानुसार एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी आणि भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

पत्रावर या ३७ आमदारांच्या सह्या आणि नावे आहेत

1. एकनाथ शिंदे,  कोपरी पाचपाखाडी ठाणे
2. भरत मारुती गोगावले,  महाड रायगड
3. विश्वनाथ भोईर,  कल्याण पश्चिम ठाणे
4. महेंद्र दुर्वे , कर्जत रायगड
5. शांताराम मोरे , भिवंडी ग्रामीण ठाणे
6. श्रीनिवास चिंतामण वनगा,  पालघर
7. लता सोनवणे चोपडा,  जळगाव
8. संजय शिरसाट , औरंगाबाद पश्चिम
9. ज्ञानराज चौगुले , उमरगा लोहारा
10. यामिनी जाधव , भायखळा मुंबई
11. शहाजी पाटील,  सांगोला सोलापूर
12. तानाजी सावंत , परंडा उस्मानाबाद
13. शंभूराज देसाई , पाटण सातारा
14. महेश शिंदे , कोरेगाव सातारा
15. प्रकाश सुर्वे , मागाठाणे मुंबई
16. संजय रायमुलकर,  मेहकर बुलढाणा
17. महेंद्र दळवी , अलिबाग रायगड
18. संदिपान भुमरे , पैठण औरंगाबाद
19. रमेश बोरनारे,  वैजापूर औरंगाबाद,
20. बालाजी किणीकर , अंबरनाथ ठाणे
21. अब्दुल सत्तार , सिल्लोड औरंगाबाद
22. प्रदीप जैस्वाल , औरंगाबाद मध्य
23. संजय गायकवाड , बुलढाणा
24. चिमणराव पाटील , एरंडोल, जळगाव
25. अनिल बाबर , खानापूर , सांगली
26. सुहास कांदे , नांदगाव नाशिक
27. प्रताप सरनाईक , ओवळा – माजिवडा , ठाणे
28. बालाजी कल्याणकर , नांदेड उत्तर
29. किशोर पाटील,  पाचोरा
30. योगेश कदम,  दापोली , रत्नागिरी
31. दीपक केसरकर,  सावंतवाडी सिंधुदुर्ग
32. मंगेश कुडाळकर , कुर्ला मुंबई
33. गुलाबराव पाटील,  जळगाव ग्रामीण
34. सदा सरवणकर ,  माहीम मुंबई
35. प्रकाश अंबीटकर  , राधानगरी कोल्हापूर
36. दादाजी भुसे , मालेगाव नाशिक
37. संजय दुलीचंद राठोड , दिग्रस यवतमाळ

या १२ आमदारांना निलंबित करा …

दरम्यान, एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी १२ जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताना ते न आल्याचे  कारण देत शिवसेनेने १२ आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

या मदारांमध्ये एकनाथ शिंदे , अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, संजय शिरसाठ,  बालाजी किणीकर,  तानाजी सावंत,  संदिपान  भुमरे,  भारत गोगावले,  लता सोनावणे , अनिल बाबर,  महेश शिंदे आणि प्रकाश सुर्वे आदींची नावे आहेत.

यावर  यांनी ट्विटद्वारे आपले उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि , कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो ! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!