Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SoniaGandhiHealthUpdate : सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी येथील सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना  घरी पाठविण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.


सोनिया गांधी यांना कोरोनापश्चात प्रकृतीच्या गुंतागुंतीमुळे १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी २ जून रोजी होकारात्मक आली होती. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या गांधी यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली. त्यांना आता घरी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, असेही ते म्हणाले. सोनिया यांच्या श्वासनलिकेच्या खालील भागात बुरशीचा संसर्ग झाल्याचेही दिसून आले होते. या संसर्गावर तसेच करोनापश्चात लक्षणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान ७५ वर्षीय सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणात ८ जून रोजी चौकशीसाठी पाचारण केले होते. पण करोना संसर्गामुळे सोनिया यांनी ईडीपुढे हजर होण्यासाठी आणखी कालावधीची मागणी केली होती. त्यानुसार ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!