Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : महत्वाची बातमी : दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या  दहावी आणि बारावी परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.

राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10वी आणि इ.12वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी आम्ही जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये पुरवणी परीक्षा घेणार आहोत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावे.

तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्सच्या तारखा …

तसेच इ.12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 08 ऑगस्ट आणि इ. 10 वीच्या परीक्षा 26 जुलै ते 08 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. सविस्तर वेळापत्रकासाठी http://mahahsscboard.in वर संपर्क साधावा या परीक्षांसाठी इ.10 वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 20 जून पासून सुरू होईल, तर इ.12 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!