Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSCResultNewsUpdate : दहावीचा निकाल जाहीर , याही वर्षी मुलींनी मारली बाजी …

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.


यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. यावर्षी  करोना संसर्गा नंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या.

राज्यात १५ लाख ९८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.

दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. राज्यातील १२,१२० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील २९ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे.

दहावी निकाल एक नजर

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी (नियमित) :  १५ लाख ८४ हजार ७९०
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी :  १५ लाख ६८ हजार ९७७
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी :  १५ लाख २१ हजार ००३
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :  टक्के ९६.९४

पुढील संकेतस्थळांवर दहावीचा ऑनलाइन निकाल पाहता येईल –

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

विभागनिहाय टक्केवारी

पुणे – ९६.९६
नागपूर – ९७
औरंगाबाद – ९६.३३
मुंबई – ९६.९४
कोल्हापूर – ९८.५०

अमरावती – ९६.८१
नाशिक – ९५.९०
लातूर – ९७.२७
कोकण – ९९.२७
एकूण – ९६.९४

गुणपडताळणी

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार २० जून ते बुधवार २९ जून पर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार २० जून ते शनिवार ९ जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!