Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MPSCNewsUpdate : परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द, पूर्व परीक्षेसाठी मात्र मुदतवाढ

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२साठी अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी एमपीएससीने अर्ज सादर करण्यास २४ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एमपीएससीने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.


एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या निर्णयात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. मात्र एमपीएससीच्या कमाल संधी मर्यादेच्या नियमामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी काही उमेदवारांना अर्ज सादर करता आला नसल्याची शक्यता आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येण्याच्या दृष्टीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार आता उमेदवारांना २४ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शुल्क भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!