Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSCResultNewsUpdate : प्रतीक्षा संपली , दहावी परीक्षेचा उद्या निकाल

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करून  दिली आहे.


या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ वाजल्या नंतर उपलब्ध होतील.

या परीक्षेसाठी १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय आणि उत्साहचा असो…

याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. आपल्या सर्वांना माहीत आहोत, की आपण सगळेजण दोन वर्षांपासून करोनाशी लढत आहोत. अशावेळी या परीक्षा घेण्यात आल्या, खूप मेहनतीने, कष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणि संयमाने आपण आपला अभ्यास पूर्ण केला आणि या परीक्षेला सामोरे गेलात.

आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल आणि विद्यार्थी किंवा पालकवर्गात थोडं टेंशनही असेल, की परीक्षेचा निकाल कधी लागणार. तर, मी आजच्या या संवादातून सांगू इच्छिते की इयत्ता दहावीचा निकाल १७ जून(उद्या) दुपारी १ वाजता ल लागणार आहे. खाली दिलेल्या विविध संकेतस्थळाच्या माध्यामतून तुम्ही हा निकाल पाहू शकता.आपण केलेल्या अभ्यासाला यश मिळणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना हीच शुभेच्छा देते, की उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय आणि उत्साहचा असो.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!