Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अॅट्रोसिटी प्रकरणात केतकी चितळेला जामीन, पण राहणार जेलमध्येच …

Spread the love

मुंबई : अॅट्रोसिटी प्रकरणात ठाणे न्यायलयाने अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणात  आज ठाणे न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान  केतकी चितळेला ठाणे कोर्टाने दिलासा दिला असला तरीही ती तुरूंगातच राहणार आहे, कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे. ज्या प्रकरणात 21 जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे.


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिच्या विरोधात त्या पोस्टनंतर राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता केतकी चितळेने  आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे तिने यापूर्वी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. आता तिने  पुन्हा नव्याने  हायकोर्टामध्ये सुटकेसाठी अर्ज केला आहे. दरम्यान  व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल आपल्याला  नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केतकीने याचिकेद्वारे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!