Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : विरोधी पक्षाच्या बैठकीत आज नेमके काय झाले ? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी जाहीर केली भूमिका…

Spread the love

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित पाच पक्ष वगळता विरोधकांची बैठक आज पार पडली. या बैठकीला विविध १७ राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून आपली संमती द्यावी असा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंडल खरा परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला. त्यांना अजूनही राजकारणात सक्रिय राहायचे असल्याचे पवार म्हणाले.


नवी दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकीवरून आज विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.या बैठकीत उपस्थित सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून पवारां यांच्या नावावर सहमती दर्शविली मात्र पवारांनी याला नकार दिला. यावर बोलताना पवार म्हणाले कि , “दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझे नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. तथापि, मला सांगावेसे वाटते की मी माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे. ” यासंदर्भात एक ट्वीट करत त्यांनी स्वतःच हि माहिती दिली आहे.

सर्वानुमते उमेदवार देण्याचा निर्णय

बैठकीला अनेक पक्षांचे नेते आले होते. आम्ही सर्वानुमते उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष या उमेदवाराला आपले समर्थन देतील. यावर आम्ही चर्चाही करू. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनी एकत्र आलो होतो, पुन्हा एकत्र येऊन चर्चा करू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. मेहबुबा मुफ्ती आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच संयुक्त बैठकीला आले होते. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना, द्रमुकचे नेते आले होते. या बैठकीत इतर संभाव्य नावावरही चर्चा झाली . याबाबत आठवडाभरात दुसरी बैठक घेण्याचे ठरले आहे. या बैठकीत संयुक्त उमेदवाराचे नाव निश्चित केले जाऊ शकते.

दरम्यान कोणतीही पूर्व माहिती न देता बैठक बोलावल्यामुले बैठकीला येत न आल्याचे काही नेत्यांनी सांगितले. या बैठकीत ममता यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची खिल्ली उडवत मसुदा प्रस्ताव मांडला, परंतु अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली असून अन्य कोणत्याही विषयावर चर्चा होऊ नये, असे अनेक नेत्यांनी यावेळी सांगितले.

विविध १६ पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती

यावेळी विविध १६ पक्षाच्या नेत्यांनी एनडीएच्या उमेदवाराच्या विरोधात विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी २१ जूनची अंतिम डेडलाईन ठरविण्यावर चर्चा केली. नावावर एकमत होण्यासाठी ममता बॅनर्जी, शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी, ८१ वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांना स्वतःच आज पूर्णविराम दिला.

इतर नावांची प्राथमिक चर्चा

दरम्यान शरद पवार यांनी नकार दिल्यावर ममता बॅनर्जी यांनी गोपाल गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची नावे सुचवली. अध्यक्षपदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जून आहे.

आजच्या बैठकीत शरद पवार यांना टीएमसी, डावे पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना अशा अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता. बैठकीनंतर ममता म्हणाल्या, “जर पवारांनी सहमती दर्शवली, तर सर्वजण त्यांना पाठिंबा देतील. जर पवारजी सहमत नसतील तर आम्ही इतर नावांवर चर्चा करू.” देशात सध्या सुरू असलेल्या ‘बुलडोझर’वर विरोधकांनी एकत्र बसून चर्चा करण्याची गरज असल्याचे ममता म्हणाल्या.

या बैठकीचे विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधील ममतांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेतेही या बैठकीत सहभागी झाले होते, परंतु टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, अकाली दल, आम आदमी पार्टी आणि जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचे नेते या बैठकीपासून दूर राहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!