Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांची ईडी चौकशी , संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवून दिले रस्त्यावर टायर …

Spread the love

नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज तिसऱ्या दिवशी ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. राहुल गांधी हे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते आणि बुधवारीही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याप्रकरणी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर गंभीर आरोप  आहे कि ,  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा राहुल गांधींवर निशाणा साधत  आहेत कारण  राहुल गांधी सातत्याने  शेतकरी, जवान आणि मजुरांसाठी आवाज उठवत आहेत  त्यामुळे त्याच्याविरुद्ध ईडीचा गैरवापर होत आहे.


दरम्यान नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल १७ तास चौकशी केली आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावल्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन  करीत  ईडी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर टायर जाळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गाँधी यांना समन्स जारी केला होता. १३ जून रोजी दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. १३ जून आणि १४ जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. काल दहा तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

यावेळी राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना बाहेर टायर पेटवले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच काही काँग्रेस नेत्यांना घरात कैद करण्यात आल्याची माहिती देखील समजत आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार देपेंदर हुड्डा यांना पोलिसांनी घरात कैद केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान एका राज्यसभा खासदाराला अशाप्रकारे कैद करणे  कोणत्या  कायद्यात बसते ? काँग्रेस खासदारांना कैद करून भाजपा सरकार आम्हाला घाबरवू शकत नाही. आज प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचा आवाज आहे, असे काँग्रेसने आपल्या  ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!