Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कारला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्ता दुभाजकावर चढली, १० प्रवासी जखमी

Spread the love

औरंगाबाद : समोर जात असलेल्या कारचालकाने अचानकरित्या रस्त्याची लेन (मार्गिका) बदलल्यामुळे कारला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकावर चढून आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले.अशी माहिती पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली. हा अपघात बुधवारी (दि.१५) सकाळी सात वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते वाळूज महामार्गावरील होलीक्रॉस इंग्रजी शाळेसमोरील वळणावर घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती.


एसटी महामंडळाच्या कोल्हापुर जिल्ह्यातील कागल आगाराची बस क्रमांक (एमएच-११-टी-९२९१) औरंगाबाद येथून प्रवासी घेवून कागलकडे जात होती. बसमध्ये १२ ते १५ प्रवासी प्रवास करीत होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते वाळूज महामार्गावरील लोखंडी पुल ओलांडल्यानंतर बस होलीक्रॉस इंग्रजी शाळेसमोरून जात होती. त्यावेळी कार क्रमांक (एमएच-२०-डीव्ही-५२३८) च्या चालकाने वळणावरील रस्त्यावर अचानकरित्या रस्त्याची लेन बदलली. त्यामुळे बसचालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस रस्ता दुभाजकावर चढली. या घटनेत बसचालकासह आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे देखील नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळाल्यावर छावणी पोलिस ठाण्याच्या कर्मचाNयांनी आणि छावणी वाहतूक शाखेच्या कर्मचाNयांनी तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाNयांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यावर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने रस्ता दुभाजकावर चढलेली बस खाली उतरवून पुन्हा दुरूस्तीसाठी मध्यवर्ती बसस्थानकातील कार्यशाळेत आणली. या अपघाताची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!