Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विवाहितेला सिडको औद्योगिक पोलिसांकडून मंगळसूत्र परत

Spread the love

औरंगाबाद – मंगळसूत्र चोरी झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात विवाहितेचे ९३हजारांचे मंगळसूत्र न्यायालयाच्या आदेशाने परंत करताच पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना फिर्यादी गहिवरले होते.


१४मे रोजी संध्याकाळी ७च्या सुमारास सावता मंगल कार्यालयाजवळ प्रियंका राहूल हिवाळे यांचे दोन तोळ्यांचे गंठण चोरट्यांनी हिसकावून मोटरसायकलवर पळ काढला होता.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे आणि गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव यांनी संयुक्त पणे कारवाई करंत दोन चोरटे, ५पोलिस ठाण्यातील गुन्हे,५लाखांचा मुद्देमाल जप्त,चौघांना बेड्या ठोकल्या होत्या. सिडको औद्योगिक पोलिस आणि गुन्हेशाखेने ५ उघडकीस आणत ४लाख ९०हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सिडको औद्योगिक पोलिसांनी उस्मानपुरा, सिटीचौक आणि स्वता:च्या पोलिस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आणत ७तोळे सोनं ,एक मोटरसायकल असा मुद्देमाल मुस्तफाखान काल्याखान(२३)रा.आझादचौक व शेख अतिक शेख बाबू (२९) रा. कटकटगेट या दोघांकडून जप्त केला. सी.सी.टिव्ही.फुटेज च्या मदतीने सिडको औद्योगिक पोलिसांनी वरील गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. तर ४मोबाईल हॅंडसेट गुन्हेशाखेने दोन चोरट्यांकडून जप्त करंत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील दोन्ही घुन्हे वेदांतनगर आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील आहेत.
सलीम मुगणी शेख(४८) रा.रहेमानिया काॅलनी व अजय बाबासाहेब गायकवाड(२२)रा.मसनतपुल अशा दोघांकडून ४मोबाईल हॅंडसेट जप्त करण्यात आले.

वरील कारवाईत सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे व पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके,सहाय्यक फौजदार रमाकांत पटारे, पोलिस कर्मचारी शेख हबीब, राजेंद्र साळुंके यांनी पार पाडली.आरोपींना वेदांतनगर व मुकुंदवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!