Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पंकजा मुंडे समर्थकांचा बीड आणि औरंगाबादेत राडा, चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा …

Spread the love

औरंगाबाद : राज्यसभा किंवा विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सकाळी बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडविल्यानंतर आज औरंगाबादमध्येही केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर चांगलाच राडा केला. हे वृत्त समजताच हे जर पंकजा मुंडे यांचे समर्थक असतील तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे अन्यथा त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीला फटका बसू शकतो असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मात्र औरंगाबादची घटना अफवा असल्याचा खुलासा क्रांतिचौक पोलिसांनी केला आहे. 


दरम्यान पंकजा मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी  हा ताफा अडवण्यापूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला . यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड करीत कार्यकर्त्यांना आवरले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारीतून डावलल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. आज दुपारी पंकजा मुंडे समर्थकांनी बीड-उस्मानाबाद सीमेवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा आणि औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेरही  पंकजा मुंडे समर्थक आणि कराड समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. परंतु वळलीच हस्तक्षेप करीत या समर्थकाला ताब्यात घेतले.यावेळी मुंडे आणि भागवत कराड यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते.

चंद्रकांत पाटील यांचा पंकजा मुंडे यांना इशारा

या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे कि , भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रविण दरेकर यांचा ताफा अडवणारे जर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्या आगामी कारकिर्दीला यामुळे फटका बसू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. यापुढे संघटनेत अशा गोष्टी सहन करणार नाही. त्यांनी आपल्या समर्थकांना समजून सांगावे अशा कडक शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना सुनावले आहे.

औरंगाबाद पोलिसांचा खुलासा

दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड  हे गोव्यात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा किंवा त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रश्नच नाही ती एक अफवा असल्याचा असा खुलासा केला आहे . मात्र या प्रकरणी  त्यांच्या कार्यालयासमोर गोंधळ घालणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,” अशी माहिती क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार  एका तरुणाला तीन ते चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव सचिन डोईफोडे असं आहे. सचिन डोईफोडे यानेच चार दिवसांपूर्वी भाजपाच्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांच्या यादीत पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यालयासमोर घोषणा दिल्या होत्या.

भाजपा कार्यालयासमोर घोषणा दिल्या तेव्हा मुंडे समर्थक सचिन डोईफोडे याच्यासह तिघांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या घटनेत डोईफोडेने घातलेला गोंधळ आणि मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली.

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ताफा अडवून त्यांच्या क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्यालयावर दगडफेक केल्याची अफवा रविवारी सायंकाळी शहरात पसरली. मात्र, या दोन्ही घटनांचे क्रांती चौक पोलिसांनी खंडण केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!