Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : भाजपच्या विजयावर शरद पवार म्हणाले चमत्कार …

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यसभेची सहावी जागा महाविकास आघाडी आणि भाजपनेही प्रतिष्ठेची बनविली होती. दरम्यान सत्ता पक्षाला राज्यातील आमदार सहजपणे आपल्या बाजूने वळतील  शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटत होते परंतु प्रत्यक्षात अतिशय हुशारीने व्युव्हरचना करीत देवेंद्र फडणवीस यांनी  आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले आणि शिवसेनेची बोलती बंद झाली. शरद पवार यांनी या विजयाला चमत्कार असे म्हटले आहे. 


अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत  महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांचाही विजय झाला. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटल्याचे समोर आले आहे. अर्थात यातील बहुतेक मते अपक्षांची असल्याने संजय राऊत यांनी कोणाची मते फुटली आहेत याची माहिती आमच्याकडे असल्याचे म्हटले आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी या आमदारांचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही असा इशारा दिला आहे.

फडणवीस यांनी चमत्कार केला : शरद पवार

दरम्यान भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षावर गडबड केल्याचा आरोप केला आहे. शरद पवार म्हणाले, “सहाव्या जागेसाठी आम्हाला कमी मते पडली होती. मात्र शिवसेनेने धैर्याने उमेदवार उभा करून जिंकण्याचा प्रयत्न केला. भाजपकडे विजयासाठी अपक्ष आमदारांची संख्या जास्त होती आणि आमच्याकडे कमी होती. अशा परिस्थितीत, आम्हाला मतदान करू इच्छिणाऱ्या अपक्ष आमदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने जी ‘यशस्वी कारवाई’ केली त्यामुळेच त्यांना विजय मिळवून दिला आणि  चमत्कार घडला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने अपक्ष आमदार मिळाल्याने.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, “या निकालांचा सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही. ही संख्या बघितली तर, सरकार चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमतापर्यंत हा आकडाही पोहोचलेला नाही. त्यामुळे काही फरक पडत नाही. मला आश्चर्य वाटते की , शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहिली तर, प्रत्येकाला जो कोटा देण्यात आला होता, त्यांनाच मते मिळाली आहेत, हे स्पष्ट होते. प्रफुल्ल पटेल यांना आणखी एक मत मिळाले आहे. ते एक मत कुठून आले, हे मला माहीत आहे. हे महाविकास आघाडीचे मत नाही, ते दुसऱ्या बाजूचे आहे.

सोनिया गांधींशी चर्चा नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, मला स्वत: एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेल यांना जे अतिरिक्त मत मिळाले आहे ते भाजपचे मत नाही. ते भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदाराचे आहे. त्याचवेळी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत माझी आतापर्यंत सोनिया गांधींसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे, त्यानंतर या विषयावर चर्चा होईल.आपण सर्वांनी बसून या विषयावर चर्चा केली पाहिजे, असा माझा विश्वास आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री जी बैठक घेणार आहेत त्यात  मी सहभागी होणार नाही. आमचे इतर  नेते त्या बैठकीला जाणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!