Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : जर पैगंबर मोहम्मद आज हयात असते तर…तस्लिमा नसरीन यांचे ट्विट ….

Spread the love

कोलकता :  एकीकडे देशात आणि विदेशात नुपूर शर्माच्या वक्तव्यावरून वातावरण चिघळले असताना बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रेषित मुहम्मद यांचा उल्लेख करत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना उद्धेशून आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘जर पैगंबर मोहम्मद आज हयात असते तर जगभरातील मुस्लिम कट्टरतावाद्यांचे वेडेपणा पाहून त्यांनाही  धक्का बसला असता.’


दोन दिवसांपूर्वी तस्लिमा यांनी  ट्विटरवर लिहिले होते की, कोणीही टीकेच्या वर असू शकत नाही, कोणीही माणूस नाही, संत नाही, मसिहा नाही, पैगंबर नाही, देव नाही. जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी गंभीर वृत्ती आवश्यक आहे. बांगलादेशात त्यांच्या ‘लज्जा’ या पुस्तकावर कडाडून टीका झाल्यानंतर तस्लिमा नसरीन जवळपास तीन दशकांपासून वनवासात आहेत.

त्यांच्या भूमिकेमुळे कट्टरपंथी संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने त्यांना १९९४ मध्ये बांगलादेश सोडावा लागला होता. तस्लिमा यांच्याकडे स्वीडिश नागरिकत्व असूनही गेल्या दोन दशकांपासून त्या कधी यूएस आणि युरोपमध्ये तर  बहुतेक वेळा अल्प निवास परवान्यावर भारतात राहतात. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा आणि भाजपमधून निष्कासित नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्यावरून देशभरात निदर्शने आणि कोलकाताजवळील हावडासह काही शहरांमध्येमोठा हिंसाचार झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!