Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WeatherNewsUpdate : मान्सून आला खरा पण उष्णतेची लाट कायम , काही राज्यात पावसाची जोरदार हजेरी …

Spread the love

नवी दिल्ली : मान्सूनच्या आगमनानंतर  देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान जून सुरु झाला असला तरी महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भात आणि उत्तर भारतातील राज्यांना पुढचे काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळणार नसल्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.


ढगांनी आकाश भरले तरी उष्णता मात्र कायम

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दिवसभरात दिल्लीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असले तरी उत्तर प्रदेशातही उन्हाचा तडाखा कायम असेल. दरम्यान महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाऊस या राज्यात लावणार हजेरी …

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ,  ६ आणि ७ जून रोजी तामिळनाडूमध्ये तर केरळ आणि महाराष्ट्रातही  ५, ६, ७, ८ आणि ९ जून रोजी पाऊस पडू शकतो. केरळनंतर पश्चिम बंगालमध्ये मान्सूनचा पाऊस पडत आहे. त्याच वेळी, ईशान्य भारतातील आसाम आणि कर्नाटकमध्येही हलका ते मध्यम मोसमी पाऊस पडत आहे.

दरम्यान मुंबईत लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, मुंबईत मान्सून आगमनाची तारीख १० जून देण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!