Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SalmanKhanNewsUpdate : सलमान आणि सलीम खान यांना धमकी देणारे संशयित कोण आहेत ? या आधीही झाला होता हल्ल्याचा प्रयत्न ….

Spread the love

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या आधी  रेडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लरेनश बिश्नोई उर्फ LB याने आपल्या टोळ्यांमार्फत सलमानवर हल्ला करण्याची योजना तयार केली होती, परंतु नेमबाजांना पसंतीची शस्त्रे न मिळाल्याने ही योजना फसली होती असे सांगण्यात येत आहे.


बिश्नोईचा सर्वात महत्त्वाचा प्यादा आणि गुंड कला जथेडीचा  गुरू नरेश शेट्टी याच्यावर  सलमान खानला मारण्याची योजना सोपवण्यात आली  होता. याशिवाय सलमान खानला टार्गेट करता यावे यासाठी गँगस्टर संपत नेहरानेही अनेक दिवस मुंबईत तळ ठोकला होता. एवढेच नाही तर कुख्यात गुंड कला जथेडीही फरार झाल्यानंतर मुंबईतच राहिला. हे सर्व गुंड मुंबईत  वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. सलमान खानच्या घराची त्यांनी अनेक वेळा रेकीही  केली होती जेणेकरून सलमान त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याला लक्ष्य केले जाऊ शकते परंतु बिश्नोई त्याच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकला नाही. सलमान खानला मारण्याच्या प्लॅनच्या प्रकरणात, त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल काउंटर इंटेलिजन्स युनिटने सलमान खानला मारण्याच्या प्लॅनमध्ये मुंबईतील रहिवासी असलेल्या लरेश बिश्नोई टोळीच्या तीन शार्प शूटरनाही अटक केली होती.
यामध्ये राजन जाट, सुमित आणि अमित छोटा यांचा समावेश होता.

चौकशीत स्वत:चा खुलासा केला

२०२१ मध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. लॉरेन्सने खुलासा केला होता की, त्याने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला सलमान खानला मारण्यास सांगितले होते. यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला. संपतने सलमान खानच्या घराची रेकी केल्याचेही त्याने म्हटले होते.

कट कसा फसला?

लॉरेन्स बिश्नोई यांनी चौकशीदरम्यान संपतकडे पिस्तूल असल्याचे उघड केले होते. मात्र या पिस्तुलामुळे तो फार दूरचे लक्ष्य भेदू शकत नाही. परिणामी लांब अंतरामुळे संपतला सलमान खानपर्यंत पोहोचता आले नाही. यानंतर संपतला त्याच्या गावातील दिनेश फौजीमार्फत आरके स्प्रिंग रायफल मिळाली. बिष्णोईने ही रायफल त्याच्या ओळखीच्या अनिल पंड्याकडून 3-4 लाखांना विकत घेतली होती. पण जेव्हा रायफल दिनेशकडे होती. त्यानंतर त्याला  पोलिसांनी पकडले . यानंतर संपत नेहरालाही अटक करण्यात आली होती.

सलमानला का मारायचे होते?

वास्तविक, काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. कारण गँगस्टर लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळे काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला आरोपी बनवल्यावर लॉरेन्स चांगलाच संतापला होता. लॉरेन्स बिश्नोई गटाने सलमान खानला मारण्याची योजनाही आखली होती. “रेडी” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लॉरेन्सने सलमान खानवर हल्ल्याची योजना आखली होती.

लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून टोळी चालवतो

लॉरेन्स बिश्नोई हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे आणि तेथून तो काम करतो असा त्याच्यावर आरोप आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा ग्रुप सुपारी घेऊन खून करतो आणि  त्यानंतर फेसबुकवर तो आपला गुन्हा कबूल करतो. या टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. त्याच्या गँगमध्ये असलेल्या गुंडांची संख्या ७०० पेक्षा जास्त आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार एकत्र काम करतात. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा हात असल्याचे वृत्त आहे.

सलमानला धमकी मिळाली

सलमानला मिळालेले धमकीचे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने पाठवले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे रविवारी हे पत्र सापडले. मॉर्निंग वॉकनंतर सलमान  ज्या ठिकाणी बसायला जातो त्या ठिकाणी सलीम खानच्या गार्डला हे पत्र सापडले. ‘सलीम खान, सलमान खान, लवकरच तुझी अवस्था सिद्धू मुसेवालासारखी होईल’, असा  धमकीवजा मजकूर या पत्रात लिहिलेला आहे. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात  पोलिसांनी भादंवि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!