Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PanjabNewsUpdate : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुण्यातून दोघांना उचलले …

Spread the love

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याची माहिती समोर येताच  या दोघांनाही पंजाब पोलिसांनी पुण्यातून आज सकाळच्या सुमारास अटक केली आहे.


पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार मुसेवालांवर हल्ला करण्यासाठी आठ शार्प शूटर नेमण्यात आले होते. त्यापैकी दोघे पुण्याचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांनी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या उचलले असल्याचे वृत्त आहे. मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आलेली. यापैकी तिघे पंजाबमधील होते. तर अन्य पाच जणांना महाराष्ट्र आणि राजस्थानमधून बोलवण्यात आले होते.

पोलिसांनी प्रारंभी दिलेल्या माहितीनुसार या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशाप्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या. समोर आलेल्या माहितीनुसार मुसेवाला यांच्या गावात हल्लेखोर पोहचले तेव्हा मुसेवालांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एके-४७ बंदुका घेऊन असलेले कमांडो पाहून परतले. त्यानंतर त्यांनी कॅनडामधील गँगस्टर सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारकडून एएन-९४ रायफल मागवली. याच रायफलने मुसेवालांची हत्या करण्यात आली.

सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…

प्रसिद्ध पंजाबी हायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

दरम्यान त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणाने सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात अली होती मात्र  पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने  या सुरक्षेमध्ये कपात करुन केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय बुलेटप्रूफ गाडी न घेता आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिली असून अधिक तपास चालू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!