Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीवरून आज दिवसभरात काय झाले ?

Spread the love

जिद्दाह : जिद्दाह येथील सौदी शहरात असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीचा निषेध केला करून म्हटले आहे की, “या वादग्रस्त वक्तव्यावरून भारतात इस्लामविरुद्ध द्वेष वाढवला जात असून मुस्लिमांविरुद्ध गैरवर्तन करण्यात यावेत असल्याचे दिसत आहे. ” यावर भारताने माफी मागावी असा दबाव आखाती देशांकडून येत आहे तर भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल देशाने का माफी मागावी ? असा प्रश्न देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित करून हे वक्तव्य करणारांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे.


दरम्यान ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) च्या  विधानाबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते, अरिंदम बागची यांनी म्हटले आहे कि ,  “आम्ही या संघटनेच्या महासचिवांचे विधान पाहिले आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या संकुचित विचारसरणीच्या विधानाला आम्ही खारीज करीत आहोत.”

ओआयसी काय आहे ?

“ओआयसी” ही मुस्लिम बहुल देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ज्याच्या सदस्य देशांमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. भारताने अनेकदा  देशाच्या अंतर्गत घडामोडींवर, विशेषत: जम्मू आणि काश्मीरशी संबंधित गोष्टींवर भाष्य केल्याबद्दल ओआयसीवर टीका केली आहे. ओआयसी स्वतःला “मुस्लिम जगाचा सामूहिक आवाज” म्हणवून घेते.

दरम्यान  पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि इराणने पैगंबर यांच्या विरोधात कथित ‘अवमानजनक ‘ टिप्पणीचा निषेध केला आहे. मात्र, सौदीने भाजपच्या नेत्यांवरील कारवाईचे स्वागत केले आहे. जेंव्हा कि , भारताने कालच स्पष्ट केले आहे कि ,  नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित केले आहे तर नवीन जिंदाल यांची पक्षातून  ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

विरोधी पक्षाचे नेत्यांकडून भाजपविरोधी सूर

प्रेषित मोहम्मद टिप्पणी वादावरून आखाती देशांच्या नाराजीवरून तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी केंद्रावर निशाणा साधताना म्हटले आहे कि ,  “भाजप कट्टरवाद्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांसाठी” भारताने एक देश म्हणून माफी का मागावी ?  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित करताना ते म्हणाले की त्यांच्या पक्षाने “दिवसेंदिवस द्वेष पसरवल्याबद्दल” भाजपने  माफी मागितली पाहिजे.  एक राष्ट्र म्हणून भारताने नाही” .

त्यांना तुरुंगात पाठवा : मायावती

दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या  प्रमुख मायावती यांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यावर पक्षाने केलेल्या कारवाईवर म्हटले की, भाजपने अशी टिप्पणी करणाऱ्यांना तुरुंगात पाठवावे. “कोणत्याही धर्माच्या बाबतीत  अशी आक्षेपार्ह  भाषा वापरणे योग्य नाही. भाजपनेही या प्रकरणी केवळ त्या नेत्यांना पक्षातून  निलंबित करून अथवा बडतर्फ करून चालणार नाही, तर त्यांना कठोर कायद्यांतर्गत तुरुंगात टाकले पाहिजे.”

देशाने माफी का मागावी ? काँग्रेसलाही सवाल

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही या प्रकरणी सरकारला घेरले असून, “भारताने कोणतीही चूक केलेली नाही, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते?”

खा . असदुद्दीन ओवेसी सरकारवर भडकले

वादग्रस्त वक्तव्याबाबत एमआयएमचे प्रमुख यांनी मोदी सरकावर विदेशात देशात बेइज्जती होत असल्याने आपला संताप व्यक्त केला आहे. इंडिया टीव्हीशी बोलताना ओवेसी म्हणाले किकी , भाजपच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद वक्तव्य केले तरीही त्यांच्याविरुद्ध १० दिवस कोणतीही कारवाई केली जात नाही आणि जेंव्हा या प्रकरणात सौदी अरेबिया , इराण , इराक , कतार , कुवेत यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर पक्षातून निलंबन केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना तत्काळ अटक का करण्यात येत नाही ? कि , फक्त पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्यानंतरच अटकेची कारवाई होते ? भारतीय मुस्लिमांना पंतप्रधान का ऐकत नाहीत ? हा आमचा प्रश्न आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम होत आहे. भारताला अधिक दराने कच्चे तेल देत आहे. जे दर दोन डॉलर होते ते आता ६ डॉलर झाले आहेत. हे देशाचे अपयश आहे.

एकीकडे भाजप आणि संघ त्यांच्या कार्यकर्त्यांना मुस्लिमांच्या विरोधात बोला असे सांगितले जात आहे आणि पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. जे काही भारतात होत आहे ते काय जगाला दिसत नाही ? एकीकडे सांगतात कि , संबंधित प्रवक्त्यांवर कारवाई केली आणि प्रवक्ते सांगतात कि , मला गृहमंत्री , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , भाजपच्या नेत्यांनी मला फोन केले आणि  आपली प्रशंसा केली . हे काय आहे ? मूर्ख बनवताय का ? त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना तत्काळ अटक करा असेही ओवेसी म्हणाले.

मोहन भागवत यांचे पूर्वज बौद्ध होते काय ?

ओवेसी पुढे म्हणाले कि , देशात धर्म संसद आणि धार्मिक नेते मुस्लिमांच्या विरोधात जाहीरपणे बोलतात तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. आरएसएस चीफ म्हणतात देशातील सर्व मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते हे काय आहे ? मग आम्ही पण विचारतो कि , भागवत यांचे पूर्वज काय बौद्ध होते काय ? हेट स्पीच देणाऱ्या ज्या व्यक्तीला  अटक होते आणि जेंव्हा तो जामिनावर बाहेर येतो तेंव्हा मुस्लिमांसह आमच्या प्रेषितांच्याही विरोधात बोलतो तरीही सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही . हि शोकांतिका आहे.

उप राष्ट्रपतींचे डिनर झाले रद्द

मित्तल यांना कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने बोलावले होते आणि ते म्हणाले की “कतार प्रकरणात भारत सरकारकडून जाहीर माफीची अपेक्षा आहे आणि या टीकेचा तात्काळ निषेध केला जाईल.” भारतीय व्यवसायासह श्रीमंत आखाती राज्याच्या उच्च-प्रोफाइल भेटी दरम्यान हे घडले आहे.

दरम्यान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी जे डिनर आयोजित केले जाणार होते, ते प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आले होते. असे कळते की उप अमीर कथितपणे कोविड एक्सपोजरच्या संपर्कात आले होते आणि उपराष्ट्रपती नायडू दोहाला पोहोचण्यापूर्वीच भारताला याची माहिती देण्यात आली होती.

कुवेतचीही माफीची मागणी

कतारप्रमाणेच शेजारच्या कुवेतनेही भारताच्या राजदूताला बोलावून या प्रतिकूल विधानांसाठी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतीय राजदूताला रविवारी बोलावण्यात आले आणि आशिया प्रकरणांसाठीच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना अधिकृत निषेध नोट सुपूर्द केली, ज्यात भाजप नेत्याने पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा स्पष्ट निषेध केला आहे. त्याचप्रमाणे इराणमधील भारताचे राजदूत धामू गड्डाम यांनाही  रविवारी संध्याकाळी तेहरानमधील परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले, जिथे वादग्रस्त वक्तव्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ‘मेहर’ या अर्ध-अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, भारतीय राजदूताने खेद व्यक्त केला आणि पैगंबराचा कोणताही अपमान अस्वीकार्य असल्याचे म्हटले.

कोण आहे नुपर शर्मा ?

नुपूरच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती व्यवसायाने वकील आणि भाजपची प्रमुख नेता असून दिल्ली विद्यापीठाची  कायदा पदवीधर आहे . २०११ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून नुपूरने एलएलएम पूर्ण केलेले आहे. नूपूर कॉलेजच्या काळापासून राजकारणात सक्रिय आहे. लिंक्डइनच्या प्रोफाइलनुसार, त्यांनी जुलै 2009 ते जून 2010 पर्यंत “टीच फॉर इंडिया” चे राजदूत म्हणून काम केलेले आहे.

राजकीय कारकीर्द

ऑस्ट्रेलिया-आशिया युथ डायलॉगनुसार, नुपूरची राजकीय कारकीर्द 2008 मध्ये सुरू झाली जेव्हा तिची दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन (DUSU) च्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी भाजपच्या युवा शाखेसाठीही काम केले आहे. नुपूरने २०१५ ची दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीच्या जागेवरून लढवली, तरीही तिला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

वादग्रस्त टिप्पणी

नुपूरच्या वक्तव्यावरून सध्या देशात आणि मुस्लिमबहुल राष्ट्रांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर  उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नामजनंतर हिंसाचार उसळल्यानंतर भाजपने नुपूर शर्मावर पक्षांतर्गत कारवाई केली असल्याचे जाहीर केले आहे. कानपूरमधील हिंसाचारात 40 हून अधिक लोक जखमी झाले असून, हिंसाचार प्रकरणात 1500 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. आखाती देशातील सौदी अरेबिया, कतार, बहारीन आणि इराणसारख्या देशांनी या टिप्पणीवर कठोर शब्दांत टीका केली आहे. याप्रकरणी कतार आणि बहरीनने भारतीय राजदूताला बोलावून नाराजी व्यक्त केली. मात्र, या देशांनी भाजपने नूपूरवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.

भारत सरकारने या टिप्पण्यांना “अयोग्य” आणि “संकुचित” म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची या विषयावरून खुलासा करताना म्हटले आहे कि , “नवी दिल्लीत सर्व धर्मांचा सर्वोच्च आदर आहे.” “काही व्यक्तींकडून एका आदरणीय व्यक्तिमत्त्वाविरुद्ध आक्रमक ट्विट आणि अयोग्य टिप्पणी केली गेली. या टिप्पण्या कोणत्याही प्रकारे भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंबित करत नाहीत.” ते म्हणाले की या लोकांवर संबंधित संस्थांनी आधीच कठोर कारवाई केली आहे.

.

 

 

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!