Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : चर्चेतली बातमी : बात दूर तलक जायेगी , पता न था… संविधानाची साक्ष देत , भारत सरकारने झटकले हात, पण कतारकडून माफीची मागणी …

Spread the love

नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या अवमानास्पद वक्तव्याचे पडसाद अरब देशांमध्ये उमटू लागले आहेत. भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जगभरातून निषेध होत आहे. कतार आणि कुवेतनंतर आता इराणनेही भारतीय राजदूताला बोलावून या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर  कुवेतमधील भारतीय राजदूताला बोलावून एक चिठ्ठी देण्यात आली असून त्यात आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यात आला आहे. या देशांनी भारत सरकारकडे माफीची मागणी केली आहे. 


विशेष म्हणजे आखाती देशाच्या अनेक शहरात मोदी सरकारच्या विरोधात लोक आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. भारताने यावर स्पष्टीकरण देताना देश संविधानावर चालतो आणि आमचे संविधान अशा विचारांना ठार देत नाही. जे लोक बोलले आहेत ते सरकारमधील नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहेत.

भारताचे स्पष्टीकरण असे आहे …

दरम्यान या सर्व घडामोडीवर, दोहा येथील भारतीय दूतावासाने एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, कतारच्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात भारताच्या बाजूने हे स्पष्ट करण्यात आले आहे की हे ट्विट भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंबित करत नाहीत. भारत सरकार विविधतेत एकता या भक्कम सांस्कृतिक परंपरेनुसार सर्व धर्मांचा सर्वोच्च आदर करते. अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर याआधीही कठोर कारवाई करण्यात आली आहे. अशा घटकांच्या  विरोधात आपण एकत्रितपणे काम करू, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. ज्याचा उद्देश आमच्या द्विपक्षीय संबंधांची ताकद कमी करण्याचा आहे.

त्यांची विधाने ही सरकारची अधिकृत भूमिका दर्शवत नाहीत…..

तेहरानमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद विधानांवर इराण सरकारने निषेध नोंदवल्यानंतर, भारतीय राजदूताने म्हटले आहे की,  अशी विधाने करणारी व्यक्ती भारत सरकारमध्ये कोणतेही अधिकृत पद धारण करत नाही आणि अशा विधानानंतर त्यांची  पक्षातूनही हकालपट्टी केली आहे तसेच त्यांची कोणतेही विधाने ही सरकारची अधिकृत भूमिका दर्शवत नाहीत.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आखाती देशांच्या दौऱ्यावर

दरम्यान भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू शनिवारी कतारला पोहोचले आहेत. रविवारी, त्यांनी कतारचे पंतप्रधान आणि अंतर्गत मंत्री शेख खालिद बिन खलिफा बिन अब्दुलाझीझ अल सानी यांची येथे भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरावर केलेल्या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. नायडू यांचे शनिवारी कतारमध्ये आगमन झाल्यानंतर दोहा विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 30 मे ते 7 जून या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात उपराष्ट्रपती अरब देशात पोहोचले आहेत. दरम्यान नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबद्ल ओमानचे ग्रँड मुफ्ती यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते. कतार पाठोपाठ कुवेत आणि इराणने  देखील नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय राजदुतांचं प्रत्युत्तर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयांचे राजदूत दीपक मित्तल यांनी कोणत्याही व्यक्तीकडून किंवा पक्षाच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांशी भारत सरकारचा संबंध नाही. भारत सरकार संविधानातील मूल्यांवर चालते. भारत एकतेमध्ये विश्वास ठेवते. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं देखील दीपक मित्तल यांनी कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले.

नवीनकुमार जिंदल यांनीही केले होते वादग्रस्त ट्विट

दरम्यान, मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी एका टीव्ही डिबेटमध्ये नुपूर शर्मांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपनं त्यांचं सहा वर्षांसाठी सदस्यत्व निलंबित केलं आहे. तर, नवीनकुमार जिंदल यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. नवीनकुमार जिंदल यांनी पैंगबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं ते नंतर डिलीट केलं होतं.

भारताकडून दिली कारवाईची माहिती …

कतारमधील सरकारनं भारताचे राजनैतिक अधिकाऱ्यांकडे एक पत्र देत भारत सरकारने  या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. भारताचे राजनैतितक अधिकारी दीपक मित्तल यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट करत वैयक्तिक टिपण्णीला भारताची अधिकृत भूमिका मानू नये असे  म्हटले आहे. कतारच्यावतीनं दीपक मित्तल यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुपूर शर्मांच्या वक्तव्याबद्दल निषेध आणि नाराजी व्यक्त केली आहे.

नुपूर शर्मांच्या निलंबनाचे  स्वागत पण माफी मागा …

कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल मुरैखी यांनी दीपक मित्तल यांच्याकडे दिलेल्या निवेदनात  नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना हटवण्यात आल्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. मात्र, त्यासोबत भारत सरकारनं या वक्तव्यांचा निषेधकरावा आणि माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांविरोधातील वक्तव्यांमुळे  हिंसा वाढू शकते, असे  ते म्हणाले.

कतारने  जारी केलेल्या निवेदनात जगभरातील २ अब्ज मुस्लीम मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांवर चालतात. धार्मिक द्वेष पसरवणारी ही वक्तव्य जगभरातील मुस्लीम समुदायाचा अपमान असल्याचे  त्यांनी म्हटले  आहे. कतार सर्व धर्मांच्या, सर्व देशांच्या नागरिकांच्या प्रती सहिष्णुता, समान मूल्यांचा स्वीकार करते, असे  म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!