Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्याचा वाद , कुवेतमध्ये भारतीय मालाची विक्री थांबवली !!

Spread the love

कुवेत सिटी : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या अनुषंगाने  भाजपच्या दोन नेत्यांनी केलेल्या वादाचे पडसाद आखाती देशात तूर्तास तरी थांबताना दिसत नाही. या वक्तव्याच्या निषेधार्थ कुवेतमधील एका सुपरमार्केटने आपल्या शेल्फमधून भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या वक्तव्यावर भारतीय राजदूताला बोलावणारा इराण हा मध्यपूर्वेतील नवा देश बनला आहे. या टिप्पण्यांना इस्लामविरोधी ठरवून अल अर्दिया को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दुकानांनी भारतीय चहा आणि इतर उत्पादने ट्रॉलीमध्ये जमा केली आहेत.


दरम्यान सौदी अरेबिया, कतार आणि या भागातील इतर देशांव्यतिरिक्त इजिप्तमधील अल अझहर विद्यापीठानेही  भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. दरम्यान हा असंतोष लक्षात घेता आधीच कारवाई करत भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. तर नवीनकुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे . तरीही कुवेत शहराबाहेरील सुपरमार्केटमध्ये भारतातून आयात करण्यात आलेले  तांदळाचे पोते , मसाले आणि मिरचीची पाकिटे असलेले  कपाट प्लास्टिकच्या चादरींनी झाकलेले आहे. या ठिकाणी त्यांनी अरबी भाषेतील संदेशात “आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत.” असे फलक लावले आहेत.

याबाबत बोलताना , स्टोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नासेर अल मुतैरी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “कुवैती मुस्लिम म्हणून आम्ही पैगंबराचा अनादर सहन करू शकत नाही.” कंपनी स्तरावरही बहिष्कार टाकण्याचा विचार सुरू असल्याचे या साखळीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर मुस्लिमांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या आठवड्यात, टिव्हीवर नुपूर शर्माने केलेली ही टिप्पणी उत्तर प्रदेशातील वादाचे  कारण म्हणून उद्धृत करण्यात आली होती. निदर्शनात त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली.

दरम्यान आखाती देशातून तीव्र प्रतिक्रिया येताच भारत सरकारने त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या  टिप्पण्यांना “अयोग्य” आणि “संकुचित” ” अराजकता निर्माण करणारे घटक ” असे म्हटले आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी , “नवी दिल्लीत सरकारला  सर्व धर्मांचा सर्वोच्च आदर आहे.” असे म्हटले होते, “काही व्यक्तींकडून एका आदरणीय व्यक्तिमत्त्वाविरुद्ध आक्रमक ट्विट आणि अयोग्य टिप्पणी केली गेली. या टिप्पण्या कोणत्याही प्रकारे भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंबित करत नाहीत.” ते म्हणाले की या लोकांवर संबंधित संस्थांनी आधीच कठोर कारवाई केली आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!