Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली , महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात  कोरोनाचे ४ हजार ५१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद देखील झालेली आहे. ज्यामुळे एकूण मृतांची संख्या ५,२४,७०१ वर पोहोचली आहे. याशिवाय देशातील अॅक्टीव्ह केसेसची संख्या २५ हजार ७८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या वाढीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने चिंता वाढली आहे. 


विशेष म्हणजे या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. २ जून रोजीही देशात ४०४१ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. २४ तासांच्या कालावधीत अॅक्टीव्ह करोना रूग्णांमध्ये १ हजार ७३० प्रकरणांची वाढ झाली आहे. तसेच, देशात मागील २४ तासांच्या कालावधीत २ हजार ७७९ करोनाबाधित बरे झाले असून, एकूण बरे झालेल्यांची संख्या ४,२६,३०,८५२ झाली.

सावधान, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत  आहे. आज या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक घेत आहेत . राज्यात शनिवारी १३५७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५९५ रुग्ण बरे झाले असून एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या ५८८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!