AkolaNewsUpdate : अकोला जि.प.च्या पोट निवडणुकीत वंचित ने सेनेची जागा खेचून मिळवला विजय

अकोला : अकोला जिल्हा परिषद हातरून गटाच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सेनेकडून हि जागा खेचून घेत विजय संपादन केला आहे. काल रविवार ५ जून रोजी हि पोटनिवडणूक पार पडली . या जागेसाठी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजप व काँग्रेस या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह पाच उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये वंचित बहूजन आघाडीच्या लीना सुभाष शेगोकार १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत त्यांना ४३०१ मते मिळाली.
या निवडणुकीत शिवसेनेच्या अश्विनी अजाबराव गवई यांचा पराभव केला. गवई यांना २६६० मते मिळाली. भाजपाच्या राधिका पाटेकर यांना २०७१ तर काँग्रेसच्या रसिका इंगळे यांना केवळ ३६२ मतांवर समाधान मानावे लागले. गेल्यावेळी शिवसेनेच्या सुनिता गोरे यांनी या सर्कलमधून विजय मिळविला होता मात्र त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक झाली आणि त्यात वंचितने सेनेकडून हि जागा खेचून घेतली यामुळे पुन्हा एकदा अकोला जिल्ह्यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचेच वर्चस्व असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे.