Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : नुपूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंध नाही …भाजप धार्मिक भेदभावाच्या विरोधात

Spread the love

नवी दिल्ली : अखेर प्रेषित मोहम्मद यांच्या संबंधाने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दाखल घेत भाजपने या वादापासून स्वतःला दूर केले आहे. या विषयावर स्पष्टीकरण देताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह म्हणाले कि , “भाजप कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान स्वीकारत नाही. कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी कोणतीही कल्पना मान्य भाजपाला मान्य नाही. दरम्यान नुपूर सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 


एका इंग्रजी टीव्ही चॅनलवरील वादविवाद कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पक्षाने नुपूर सिंह यांच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट करीत भाजपचा धार्मिक एकतेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे.

भाजपच्या मुख्यालयाच्या प्रभारींनी रविवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माचा विकास झाला आहे. भारतीय जनता पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो. भाजप कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा अपमान करणार नाही. तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारधारेच्या विरोधात आमचा पक्ष आहे. भाजप अशा कोणत्याही विचारसरणीचा प्रचार करत नाही.”

पक्षाने पुढे म्हटले आहे की, “भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म पाळण्याचा अधिकार दिला आहे. भारत स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना, आम्ही भारताला एक महान देश बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.” जिथे सर्व समान आहेत आणि प्रत्येकजण सन्मानाने सोबत राहतो.  जिथे सर्वजण भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी वचनबद्ध असून देशाच्या विकासाचा सर्वांनाच लाभ मिळतो. दरम्यान  नुपूर शर्मा यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजातील लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!