Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPLatestNewsUpdate : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी नुपूर शर्मा पक्षातून निलंबित तर , नवीनकुमार जिंदाल यांची हकालपट्टी

Spread the love

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून सातत्याने होणाऱ्या विरोधानंतर एकीकडे भाजपने नुपूर शर्माला निलंबित केले आहे तर दुसरीकडे नवीन कुमार जिंदाल यांचीही  पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.भाजपचे दिल्ली राज्य मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना पक्षाने जारी केलेल्या हकालपट्टी पत्रात तुम्ही सोशल मीडियावर जातीय सलोखा भडकवणारे विचार व्यक्त केल्याचे लिहिले आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या मूळ कल्पनेच्या विरोधात आहे. दुसरीकडे, नुपूर शर्मा यांच्याबाबत जारी करण्यात आलेल्या पत्रात तुम्ही पक्षाच्या विरुद्ध मत व्यक्त केल्याचे लिहिले आहे. जे पक्षाच्या घटनेतील नियम 10 (अ) च्या विरोधात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तुम्हाला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.


तत्पूर्वी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह म्हणाले, “भाजप कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान स्वीकारत नाही. कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी कोणतीही कल्पना मान्य नाही. मुख्यालयाच्या प्रभारींनी रविवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माचा विकास झाला आहे. भारतीय जनता पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो. भाजप कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा अपमान करणार नाही. “त्याचा आम्ही  तीव्र निषेध करतो. आमचा पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारधारेच्या विरोधात आहे. भाजप अशा कोणत्याही विचारसरणीचा प्रचार करत नाही.”

दरम्यान मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.रझा अकादमीच्या मुंबई विंगचे जॉइंट सेक्रेटरी इरफान शेख यांच्या तक्रारीच्या आधारे शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्ञानवापी मुद्द्यावर एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं त्यात म्हटलं आहे. याशिवाय जिंदाल यांनी देशहिताच्या विरोधात ट्विट केल्याचा आरोप केला होता. शर्मा आणि जिंदाल यांनी केलेल्या कमेंटनंतर आखाती देशांतील अनेक ट्विटर युजर्सनी भारतात बनवलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी आवाज उठवला होता. काही ट्विटर युजर्सने लिहिले की, “अशा नेत्यांना तात्काळ तुरुंगात पाठवले पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांना अटक करण्यासाठी रस्त्यावर उतरू.”

नुपूर शर्माने एका इंग्रजी टीव्ही चॅनलवरील डिबेट शोदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे. अलीकडेच कानपूरमध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!