Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सीबीआयने मृत घोषित केलेली खून प्रकरणातील साक्षीदार महिला पोहोचली थेट न्यायालयात … !!

Spread the love

पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्या प्रकरणात शुक्रवारी नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मृत घोषित केलेली महिला साक्षीदार बदामी देवी शुक्रवारी न्यायालयात हजर झाली. विशेष म्हणजे कोर्टात सीबीआयने बदामी यांच्या मृत्यूचा अहवाल दाखल केला होता, या पार्श्वभूमीवर सदर महिला “हुजूर, मी जिवंत आहे. मला सीबीआयने मृत घोषित केले आहे.” अशी न्यायालयाच्या दारावर थाप देत न्यायालयात हजर राहिल्याने सीबीआयचे अधिकारी अडचणीत आले आहेत.


हे प्रकरण  सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन यांच्या लाजून खटल्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये बदामी देवी साक्षीदार आहेत. सीबीआयने 24 मे रोजी बदामी देवी मृत असल्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. दरम्यान बदामी देवी यांना माध्यमांद्वारे ही माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले आणि आज त्या  स्वतः कोर्टात हजर होऊन , “हुजूर मी जिवंत आहे.” असे म्हणत  स्वतःचे आय कार्ड, पॅन कार्ड, व्होटर आय कार्ड न्यायालयासमोर दाखल केले. यावर तीव्र आक्षेप घेत न्यायालयाने सीबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही तीच महिला आहे जिच्या घरावर या खून खटल्यातील आरोपींनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पत्रकार राजदेव रंजन सातत्याने आवाज उठवत होते. यानंतर पत्रकार राजदेव रंजन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

बदामी देवी म्हणाल्या, “माझ्या वयाची 80 वर्षे ओलांडली आहेत, पण जेव्हा मला  मृत घोषित करण्यात आल्याचे कळले तेव्हा मला  खूप वाईट वाटले. हे सर्व आरोपींच्या संगनमताने घडले आहे.” सीबीआयचे  वकील शरद सिन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला. म्हणाले, “हा मोठा निष्काळजीपणा आहे. देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा अशा पद्धतीने काम करत असेल तर काय होईल? विशेष म्हणजे सीबीआयने  सदर साक्षीदार महिलेला केवळ मृत घोषित केले नाही तर कोर्टात तास अहवालही सादर केला. उल्लेखनीय म्हणजे, 13 मे 2016 रोजी राजदेव रंजन यांची सिवानच्या स्टेशन रोडवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तपासानंतर सीबीआयने माजी खासदार मोहम्मद यांना अटक केली. शहाबुद्दीनसह आठ आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!