Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मुख्यमंत्री योगी आपल्या कॅबिनेटसह रंगले “पृथ्वीराज “मध्ये !! यूपीत सिनेमा केला टॅक्स फ्री ….

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट पाहिला. यावेळी त्याच्यासोबत चित्रपटाचा अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरही होती. चित्रपट पाहिल्यानंतर सीएम योगी म्हणाले की हा चित्रपट यूपीमध्ये करमुक्त असेल. यावर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ” काश्मीर फाईल ” नंतर आता गृहमंत्र्यांसह भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री , भाजप नेते आता ” पृथ्वीराज ” च्या प्रमोशनला लागले आहेत हे विशेष. 


इतिहासाच्या पिठापासून वर्तमानाची भाकरी करता येत नाही : अखिलेश

अखिलेश यादव यांनी यावर ट्विट करताना लिहिले आहे कि ,  “ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाला विनंती आहे की त्यांनी उत्तर प्रदेशची सद्यस्थिती देखील पाहावी. इतिहासाच्या पिठापासून वर्तमानाची भाकरी करता येत नाही.”

शुक्रवारी योगी मंत्रिमंडळासाठी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते परंतु , राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर भेटीमुळे योगी हा चित्रपट पाहण्यासाठी उशिरा पोहोचले होते.

गृहमंत्र्यांनीही सहकुटुंब बघितला पृथ्वीराज

दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यांची पत्नी सोनल आणि मुलगा जय शहा यांनीही  बुधवारी दिल्लीत ‘सम्राट पृथ्वीराज’च्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी पीरियड ड्रामाच्या कलाकारांचे आणि क्रूचे कौतुक केले. यावर आपली प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले होते की, इतिहासाचा विद्यार्थी म्हणून, भारताच्या सांस्कृतिक युद्धांचे चित्रण करणारा हा चित्रपट पाहण्यात मला आनंद तर आलाच, पण या सिनेमात भारतीयांचे चित्रण ज्याप्रकारे करण्यात आले आहे ते पाहून ते हरखून गेले. अमित शाह म्हणाले की, 13 वर्षांनंतर मी कुटुंबासह थिएटरमध्ये चित्रपट पाहत आहे. त्याच्या कुटुंबीयांसाठी तो खूप आनंदाचा क्षण होता.

अमित शाह पुढे म्हणाले की हा चित्रपट खरोखरच महिलांचा आदर आणि सशक्तीकरण करण्याची भारतीय संस्कृती दर्शवतो. मध्ययुगीन काळात स्त्रियांना मिळालेल्या राजकीय शक्ती आणि निवडीचे स्वातंत्र्य याबद्दल चित्रपटाने एक अतिशय मजबूत संदेश दिला.

सम्राट पृथ्वीराजाच्या यशासाठी अक्षय कुमारचे ” हर हर महादेव…”

दरम्यान आपला चित्रपट हिट व्हावा म्हणून  अक्षय कुमार याने काशीमध्ये बाबा विश्वनाथाचे दर्शन घेऊन ” हर हर महादेव…” चा नारा दिला.  याचा फोटो त्याने त्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो भक्तीच्या रंगात दिसत आहे. त्याने गळ्यात  रुद्राक्षाची जपमाळ घातली असून फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यांनी कपाळाला तिलक लावला असून हातात पूजेचे ताट घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!