Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : साकीनाका बलात्कार आणि खून प्रकणात आरोपीला फाशीची शिक्षा

Spread the love

मुंबई : राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते, न्यायालयाने आज या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.


या प्रकरणात साकीनाका येथे झालेल्या ३० वर्षीय महिलेवर बलात्कार आणि खून प्रकरणातन्यायालयाने सर्व आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवले होते. मुंबईतील या घटनेनंतर संपूर्ण राज्यात  संताप व्यक्त करण्यात आला होता. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याने गंभीर अवस्थेत पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु  उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला तडकाफडकी अटक करत सदर गुन्ह्यात बारकाईने तपास करून आरोपीविरुद्ध  ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले  होते. खैरानी रोड साकीनाका येथील  एक पुठ्ठ्याची कंपनी भागात हि घटना घडली होती. याबद्दल दिनांक १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरु असल्याचं कळवलं होते.

याबाबतची माहिती मिळताच कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले  होते. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. वेळ न दवडता पोलिसांनी त्याच टेम्पोमध्ये रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार दरम्यान पीडितेच्या मृत्यू झाला. दरम्यान  सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!